Tuesday, July 16, 2024
Homeक्राइमशिक्रापूर येथे डोक्यात हत्याराने मारत ५० वर्षीय इसमाचा खून

शिक्रापूर येथे डोक्यात हत्याराने मारत ५० वर्षीय इसमाचा खून

शिक्रापूर (ता. शिरूर) बजरंगवाडी येथे ५० वर्षीय इसमाचा अज्ञात कारणावरून कोणत्यातरी हत्याराने डोक्यात मारल्याने व गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली असून याबाबत मयत इसमाचा मुलगा रामसनेही छोटकन गौतम (वय ३१ वर्षे), सध्या राऊरूळी देवाची, ता.हवेली मूळ उत्तरप्रदेश यांनी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.(Crime News)

शिक्रापूर पोलीस स्टेशन येथून मिळालेल्या माहितीनुसार , दि. १७ रोजी मयत इसम छोटकन गौतम यांचा राहते घरामध्ये पडून दुपारी दीडच्या सुमारास अपघात झाला असून त्यांना उपचारकामी माऊलीनाथ हॉस्पीटल येथे व तेथून ससुन हॉस्पीटल पुणे येथे घेवून जात असताना रस्त्यात मयत झाला असल्याबाबत प्राथमिक खबर मुलगा मुलगा रामसनेही छोटकन गौतम (वय ३१ वर्षे), सध्या रा.ऊरूळी देवाची, ता.हवेली मूळ उत्तरप्रदेश याने दिली होती.

 फिर्यादी मुलगा रामसनेही छोटकन गौतम याने  वडील राहत असलेले ठीकाणी बंजरंगवाडी येथे  जावून चौकशी केली असता तेथे मला तेथे राहणाऱ्या शेजाऱ्याने  सांगितले की, रूममध्ये असताना शेजारी राहणारे मयत छोटकन गौतम याचे रूममधुन ओरडण्याचा आवाज आला म्हणून जावून पाहीले  असता चाळीमध्ये राहणारा तरून ठाकुर याने शेजाऱ्याला पाहून धाबरून गरबडीमध्ये रूमचे बाहेर निघुन गेला तेंव्हा रूममध्ये छोटकन गौतम हा खाली पडलेला होता. त्याचा श्वास घरघर असा होत होता व बेशुध्द आवस्थेत होता. त्याचे डोक्यास जबर मार लागल्याने त्यातुन रक्त वाहत होते. यावरून खात्री झाली की तरून ठाकूर याने कोणत्यातरी कारना वरून छोटकन गौतम याचे डोक्यामध्ये कोणत्यातरी हत्याराने मारहाण करून त्यामध्ये छोटकन गौतम यास गंभीर मार लागला आहे. (Murder Case)

   यावरून  तरून ठाकुर  सध्या रा. बजरंगवाडी शिक्रापूर याने कोणत्यातरी कारणावरून  कोणत्यातरी हत्याराने डोक्यामध्ये जबर मारहाण करून त्यांना गंभीर दुखपत करून त्यांचा खुन केला असल्याची फिर्याद दिली आहे.सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे करता आहेत.(pune gramin police)

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!