Tuesday, July 16, 2024
Homeक्राइमशिक्रापूर (बुरुंजवाडी) येथे चोराने चोरले इलेक्ट्रीक गीझरसह जँग्वार कंपनीचे सहा नळ व २२...

शिक्रापूर (बुरुंजवाडी) येथे चोराने चोरले इलेक्ट्रीक गीझरसह जँग्वार कंपनीचे सहा नळ व २२ हजारांची रोख रक्कम

बुरुंजवाडी (ता. शिरूर) येथे चोराने एक इलेक्ट्रीक गीझर, जँग्वार कंपनीचे सहा नळ व रोख रक्कम अशी चोरी केली असून आता घरातील साहित्यही सुरक्षित नसून चोर कधी काय चोरतील याचा नेम नाही.याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यात आली आहे.(Crime News)

  शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे  संतोष सुखदेव सरोदे (वय ४२वर्षे)  बुरूंजवाडी यांनी फिर्याद दाखल केली असून दि.१८ मे  रोजी सायंकाळी साडेसहा वा ते दि.१९ मे  रोजी सव्वाआठ वा चे दरम्यान मौजे बुरूंजवाडी, शिक्रापुर येथील  सचिन हीराभाऊ टेमगीरे यांच्या घराचे कोणीतरी अज्ञात चोरटयाने कपांउंडची लोखंडी जाळी कापुन घराचे मुख्य दरवाज्याचे लाँक तोडुन घरामध्ये  प्रवेश करून ३३,४०० रूपये कींमतीचा रोख रक्कम व मुददेमाल घरफोडी करून चोरून नेला आहे.(Pune Gramin police)

     यामध्ये  २२ हजार रुपयांची रोख रक्कम , जँग्वार कंपनीचे सहा नळ किंमत ५४०० व एक इलेक्ट्रीक गीझर सहा हजार रुपये असा ३३,४०० रुपयांची चोरी झाली आहे .सदर प्रकरणाचा पुढील तपास पो.हवा.होनमाने करत आहेत.(Crime News)

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!