दि. २४ मे . शिक्रापूर (ता.शिरूर) येथे ग्रामपंचायत सभागृहामध्ये ‘गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व करिअर गाईडन्स” हा कार्यक्रम ग्रामपंचायत शिक्रापूर व अँम्बीशन सायन्स अँकॅडमी यांच्या संयुक्त विदयमानाने पार पडला.
या कार्यक्रमास शिक्रापूर ग्राम नगरीचे आदर्श सरपंच रमेश गडदे ,जिल्हा परिषद सदस्या कुसुम धैर्यशील मांढरे ,उपसरपंच सारिका सासवडे, ग्राम पंचायत सदस्य कृष्णा सासवडे, ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे, युवा उद्योजक अतुल थोरवे , दिशा इन्स्टिट्यूट वाघोली प्रा. विकास ढगे या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत शिक्रापूर पंचक्रोशीतील नुकत्याच CBSE बोडच्या दहावीच्या परीक्षा पास झालेल्या विदयार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. राजाराम राठोड सर यांनी केले. या कार्यक्रमास शिक्रापूर पंचक्रोशीतील नागरिक विद्यार्थी, पालक यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमास उपस्थित् सर्वांचे दहीवानंतर काय? या विषयावर प्रा विकास ढगे सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले
कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वांचे अँबिशन सायन्स ॲकॅडमी यांनी आभार मानले तर स्वप्नील फुलसुंदर सर यांनी भविष्यातही अर अश्या कार्यक्रमांचे नियोजन करून शिक्रापूर पंचक्रोशीतील CBSE दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून पुढील वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले जाईल असे सांगितले कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने करण्यात आला.