यशाची परंपरा कायम ! राज्य गुणवत्ता यादीत १२ तर जिल्हा गुणवत्ता यादी ४४ विद्यार्थी तसेच नवोदय विद्यालयासाठी चार विद्यार्थ्यांची निवड.
शिक्रापूर (ता.शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील सन २०२३-२४ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये शाळेने उत्तुंग यश प्राप्त केले शाळेतील उत्कर्षा विनोद दानवे ही विद्यार्थिनी २९० गुण घेऊन राज्यात प्रथम आली असून राज्य गुणवत्ता यादीत १२ विद्यार्थी व जिल्हा गुणवत्ता यादी ४४ विद्यार्थी असे एकूण ५६ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत त्याचप्रमाणे जवाहर नवोदय विद्यालयासाठी शाळेतील चार विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे.
सदर विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षक म्हणून अर्चना मांढरे, सुरेखा गिरवले, वर्षा जकाते, मनीषा मोरे, पांडुरंग नाणेकर, संजय थिटे, बबन पुंडे यांनी मार्गदर्शन केले.मार्गदर्शक शिक्षक व विद्यार्थी यांचे कौतुक करण्यासाठी शिक्षण परिषदेचे सहाय्यक संचालक ज्योती परिहार,शिरूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर, विस्ताराधिकारी वंदना शिंदे तसेच केंद्राचे केंद्रप्रमुख प्रकाश लंघे उपस्थित होते.
शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य कुसुम मांढरे, शिक्रापूरचे आदर्श सरपंच रमेश गडदे, उपसरपंच सारिका सासवडे, ग्राम पंचायत सदस्य प्रकाश वाबळे, माजी उपसरपंच तथा व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ञ नवनाथ सासवडे,ज्येष्ठ पत्रकार व नाट्य परिषदेचे राजाराम गायकवाड गायकवाड,व्यवस्थापन समिती अध्यक्ष सनी जाधव,उपाध्यक्ष चंद्रकांत मांढरे, सदस्य वंदना वर्मा, कमल जगदाळे ,आधार फाऊंडेशन उपाध्यक्ष पल्लवी हिरवे, ग्रामस्थ, पालक,शिक्षक उपस्थित होते.
शाळेने मिळवलेले उत्तुंग यश हे शिक्षकांच्या कष्टाचे प्रतीक आहे असे गौरवोद्गार आलेल्या सर्व मान्यवरांनी काढले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टाकळकर सर यांनी तर सर्वांचे आभार शाळेचे मुख्याध्यापिका साधना शिंदे यांनी मानले.
शिक्रापूर शाळेची यशाची परंपरा कायम एकूण ५३ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक.सन २०२३-२४ शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी निकाल राज्य गुणवत्ता यादी- उत्कर्षा विनोद दानवे राज्यात प्रथम प्रथम आली असून शाळेतील मनस्वी नाईक, अथर्व पाखरे, श्रावणी कुताळ , जिज्ञासा मगदूम, श्रावण म्हस्के, जानवी जगदाळे, जीविका वानखडे, आदर्श गायकवाड, प्रतीक्षा वाघ,मयूर डोईफोडे, अल्माज खान यांनी राज्य गुवताता यादीत उत्कृष्ट यश संपादन केले.