Tuesday, July 16, 2024
Homeइतरशिक्रापूरात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या १७ वर्षीय युवतीचा विनयभंग

शिक्रापूरात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या १७ वर्षीय युवतीचा विनयभंग

तीन वर्षांपासुन वारंवार मानसिक त्रास देत विनयभंग केल्याची घटना

शिक्रापुर (ता. शिरुर) येथे पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या १७ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मैत्रीचे संबंध प्रस्थापित करत गेल्या तीन वर्षांपासुन वारंवार मानसिक त्रास देत विनयभंग केल्याची घटना घडली असून आरोपी आरोपी सलीम पप्पु शेख (वय २१ वर्षे, रा. शिकापूर, ता. शिरूर) यांच्यावर गुन्हा दाखला करण्यात आला आहे.

सलीम शेख यांची मागील तीन वर्षांपूर्वी ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. मागील एक वर्षापासून दोघेही फोनवर बोलत होते. ऑगस्ट २०२३ पासुन शेख युवतीचा पाठलाग करुन बोलण्याचा प्रयत्न करायचा. तसेच वारंवार फोन करुन मानसिक त्रास द्यायचा. पिडीत युवतीने ‘मला तुझ्या सोबत बोलायचे नाही’, असे सांगितले होते. तरीही तो बोलण्याची विनंती करायचा.

सप्टेंबर २०२३ मध्ये पिडितेला घराच्या बाहेर बोलावून घेत ‘माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे’ असे बोलून त्याने युवतीच्या हाताला धरुन विनयभंग केला. हा प्रकार मुलीच्या आईला समजल्यावर त्यांनी आरोपी आणि त्याच्या वडिलांना सांगितले. यावेळी त्यांनी आईची माफी मागितली

दरम्यान, अल्पवयीन मुलगी मार्च २०२४ मध्ये पोलीस भरतीची तयारी करीत असताना आरोपीने पिडितेला फोन करुन तु अकॅडमीमध्ये का गेलीस, घरी परत ये नाहीतर मी माझ्या जीवाचे बरे वाईट करेन, अशी धमकी दिली.

घाबरलेल्या तरुणीने हा प्रकार आईला सांगितला. यानंतर आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिप रतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!