Tuesday, September 10, 2024
Homeताज्या बातम्याशिक्रापूरचे आदर्श सरपंच रमेश गडदे यांचा आरोग्याविषयी विचार ग्रेट, वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकाला...

शिक्रापूरचे आदर्श सरपंच रमेश गडदे यांचा आरोग्याविषयी विचार ग्रेट, वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकाला दिली अनोखी भेट

शिक्रापूर (ता.शिरूर) येथील आदर्श सरपंच रमेश गडदे यांनी ज्येष्ठ नागरिक शंकरराव इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त सायकल भेट देत अनोखं वाढदिवस साजरा करण्यात आला.

       काळ बदलत गेला तशी दळणवळणाची साधने बदलत गेली चार व दुचाकी यांच्या आलिशान जगतात सायकल मात्र दुर्लक्षित राहिली.पण आजही अनेक ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास हा सायकलवर असतो असाच प्रवास शंकरराव इंगळे यांचा सातत्याने सुरू असतो.

आपल्या गावातील या ज्येष्ठ नागरिकाला बदलत्या काळातही सायकल चालवताना पाहून आदर्श सरपंच रमेश गडदे यांना आपुलकी व  प्रेम वाटायचे या जीवलगासाठी आपण त्यांच्या आवडीचे काहीतरी करावे असे मनोमन वाटत असे आणि निमित्त झाले त्यांच्या वाढदिवसाचे यावेळी खूप विचार करून आदर्श सरपंच रमेश गडदे यांनी सायकल भेट देण्याचे ठरवत इंगळे यांना सायकल भेट दिली.

    वाढदिवसाच्या सुरुवातीला म्हणजे रात्री बारा वाजता मित्रमंडळी व ग्रामस्थ एकत्र आले व ज्येष्ठ नागरिक शंकरराव इंगळे यांना सायकल भेट आश्चर्याचा धक्का दिला. या भेटीने शंकरराव इंगळे यांनी मनातून आनंद व्यक्त करत सर्वांचे आभार मानले.

    यावेळी पंढरीनाथ गायकवाड, मयूर तकटे, अली  तांबोळी, आयुब तांबोळी, बाळासाहेब मांढरे खंडेराव तनपुरे, जालिंदर मांढरे, महंमद तांबोळी, अंकुश घारे, ग्रंथपाल संतोष काळे, अविनाश कदम, पत्रकार राजाराम गायकवाड, निलेश जगताप मान्यवर उपस्थित होते.

आपल्या अगोदरची पिढीच्या जीवनाचा अविभाज्य भाग सायकल व बैलगाडी होता आता काळ बदलला असा तर अनेक ज्येष्ठ नागरिक सा वापरतात.सायकल वापरल्याने शरिरिक्तरोग्य सुदृढ राहते, व्यायाम होतो व एकमेकांना भेटण्यासाठी मित्र एकत्र येतात त्यामुळे त्यांचे मन आनंदी राहते.यासाठी ही सहृदय भेट दिली आहे. –आदर्श सरपंच रमेश गडदे,शिक्रापूर ग्राम पंचायत

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!