Tuesday, July 16, 2024
Homeक्राइमवाघोली येथे नऊ वर्षाच्या मुलीला दहा रुपये देण्याचे आमिष दाखवून अश्लील वर्तन...

वाघोली येथे नऊ वर्षाच्या मुलीला दहा रुपये देण्याचे आमिष दाखवून अश्लील वर्तन करणाऱ्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दखल

लोणीकंद (ता.हवेली) नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला दहा रुपये देण्याचे आमिष दाखवून तिच्यासोबत अश्लील वर्तन केल्याचा प्रकार वाघोली परिसरात घडला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी एका व्यक्तीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

हा प्रकार रविवारी (दि २६) रात्री साडे दहा ते अकराच्या दरम्यान घडला आहे. याबाबत पिडीत मुलीच्या ३७ वर्षीय वडिलांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार जावेद उर्फ आरीफ अमीर खान याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांच्या महितीनुसार, आरोपी आणि तक्रारदार एका भागातील आहेत. आरोपीने तक्रारदार यांच्या ९ वर्षाच्या मुलीसोबत अश्लील चाळे केले. तसेच तिला १० रुपये देण्याचे आमिष दाखवून तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव करुन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पिडीत मुलीने तिच्या वडिलांना सांगितला. त्यांतर घटना समोर आली.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!