Monday, October 14, 2024
Homeक्राइमवाघोलीत १७ वर्षीय मुलीवर दोघांचा लैंगिक अत्याचार; मुलगी गर्भवती तर आईसह तिघांवर...

वाघोलीत १७ वर्षीय मुलीवर दोघांचा लैंगिक अत्याचार; मुलगी गर्भवती तर आईसह तिघांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

वाघोली (ता.हवेली) १७ वर्षीय मुलीवर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना वाघोलीत घडली असून यामध्ये मुलगी गर्भवती राहिली आहे. मुलीवर अत्याचार होवूनही तिच्या आईने अत्याचार करणाऱ्याची साथ दिल्याने आईसह तिघांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत तिनेच लोणीकंद पोलीसात फिर्याद दिली. अविनाश शेळके, गोविंद काकडे, व तिची आई ( तिघेही रा. वाघोली ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ही एका कापड दुकानात काम करते. तिथे शेळके याच्याशी तिची ओळख झाली. शेळके याने लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादी हिच्या सोबत दोन तीन वेळा जबरदस्तीने शारिरीक संबंध केले.

    तसेच स्वतःच्या मोबाईल मध्ये फिर्यादीचे नग्न फोटो काढले व ते व्हायरल करण्याची धमकी देवून पुन्हा दोन वेळा जबरदस्तीने शारिरीक संबंध केले. तर काकडे हा फिर्यादीच्या आईचा मित्र आहे. त्याने ही एके दिवशी फिर्यादीची आई घरात नसताना जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक सबंध ठेवले. याबाबत तिने अत्याचाराबाबत आपल्या आईला सांगितली.

मात्र आईने तिलाच धमकी देवून काकडे याचे नाव कुठेही घ्यायचे नाही. अशी उलट धमकी दिली. तसेच पोलीसात तक्रार करू दिली नाही. यानंतर तिला एका सामाजिक संस्थेत ठेवण्यात आले. तेथे तिला त्रास होवू लागल्याने तिची तपासणी केली असता ती गरोदर असल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर तिने स्वतः पोलीसात तक्रार दिली. फिर्याद दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास करे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) सीमा ढाकणे यांनी गुन्हा दाखल करून तात्काळ तिघांना अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!