Saturday, September 14, 2024
Homeक्राइमAccident..वढू बुद्रुक रत्यावरील गतिरोधकावरून गाडी घसरून वढू बुद्रुक ग्राम पंचायत सदस्य जागीच...

Accident..वढू बुद्रुक रत्यावरील गतिरोधकावरून गाडी घसरून वढू बुद्रुक ग्राम पंचायत सदस्य जागीच बेशुद्ध पडत गंभीर जखमी

गतिरोधक ठरातायेत अपघाताला निमंत्रण

कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथे काही दिवसांपूर्वी थार गाडीने एका वृद्ध महिलेला उडवत शरीराचे दोन तुकडे केल्याची घटना ताजीच असताना वढू बुद्रुक रस्त्यावर एक गंभीर अपघात झाला असून यामध्ये गतीरोधकावरून गाडी आपटत घसरल्याने अंदाजे १०० फुटांपर्यंत गाडी घसरल्याने वढू बुद्रुक ग्राम पंचायतीचे सदस्य वैभव भंडारे यांना गंभीर दुखापत झाली आहे.

दिनांक २६ एप्रिल रोजी रात्री तीनच्या सुमारास वढू बुद्रुक ग्राम पंचायतीचे सदस्य वैभव भंडारे आपल्या दुचाकी स्कुटीवरून जात असताना फडतरे वस्ती येथील मोठ्या गतिरोधकावर गाडी आपटून घसरल्याने वैभव भंडारे अंदाजे साधारणतः १०० फूट घसरले व जग्यवराच बेशुद्ध पडले यानंतर त्यांना उपचार मिळण्यासाठी बराचसा वेळ लागला.सध्या त्यांच्यावर पुण्यातील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

फडतरे वस्ती येथे मोठ्या लांबी, रुंदी व जास्त उंचीचे गतिरोधक बसवण्यात आले आहेत संबधित गतिरोधक हे अपघाताला निमंत्रण ठरत असून गतिरोधक बसवायला हवेत पण त्याची लांबी रुंदी व उंची ही शासनाने निर्धारित केलेल्या निकषानुसार असावी व त्यामुळे दुचाकुबव चारचाकी वाहन चालकांना त्रास होऊ नये तसेच अपघात होऊ नये अशी असावी.

फडतरे वस्ती येथील गतिरोधक अपघाताला निमंत्रण ठरत असून हे गतिरोधक दुरुस्त करण्यात येऊन त्यापासून दुचाकी व चारचाकी वाहनांचे अपघत होणार नाही असे असावे अशी मागणी करण्यात येत आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!