Tuesday, September 10, 2024
Homeइतरवढू बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी अनुभवली मॉलची सफर

वढू बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी अनुभवली मॉलची सफर

हंसा सि‌द्दीकी यांच्या सहकार्याने मुलांना मिळाला आनंद

कोरेगाव भिमा – वढू बुद्रुक (ता.शिरूर) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वखारीचा मळा(केंद्र-करदी) येथील इ. १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांना हिंदू नववर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सामाजिक कार्यकर्त्या हंसा सिद्दीकी यांच्या आर्थिक सहकार्याने विद्यार्थ्यांना फिनिक्स मॉलची सफर घडवल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.

    शाळेतील शिक्षक प्रदीप ढोकले यांच्या प्रयत्नांनी व समाज माध्यमाचा प्रभावी वापर करत वि‌द्यार्थ्यांसाठी एखादे बालनाट्य, सर्कस अथवा मल्टीप्लेक्समध्ये छानसा चित्रपट दाखवण्याचा उद्देश सफल झाला असून  फेसबुकच्या माध्यमातून परिचय झालेल्या हंसा सि‌द्दीकी यांनी वखारीचा मळा शाळेतील सर्व वि‌द्यार्थ्यांना स्वखाचनि -फिनिक्स मॉलची सफर घडवून आणली.

        तसेच तेथील फूडकोर्टमध्ये सर्व बालचमूंना बर्गर व आईसक्रीमची मेजवानीही दिली, त्यानंतर मॉलमधीलच PVR सिनेमा येथे गाँडझिला व्हर्सेस काँग – द न्यू एम्पायर हा हिंदी 4DX-3D तंत्रज्ञानावर आधारीत चित्रपट दाखवला. अॅक्शन आणि थ्रिलरने भरलेला हा सिनेमा पाहताना मुझे भलतीच खुश झाली. आयुष्यात पहिल्यांदाच थिएटरमध्ये चित्रपट पाहिल्याचा आनंद मुलांच्या चेल्यावरून ओसंडून वाहत होता. विशेष म्हणजे वयाची ७८ वर्षे पूर्ण केलेल्या हंसा सि‌द्दीकी मॅडम यांनीही संपूर्ण दिवस विद्यार्थ्यांसोबत  आनंद लुटला, शाळेतील सहशिक्षक भाऊसाहेब ठोंबरे योनी मॅडमचे आभार मानले.

      या उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नामदेव शिवले व उपाध्यक्ष अंकुश शिवले, तसेच सर्व सदस्य यांचे अमूल्य असे सहकार्य मिळाले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!