Tuesday, July 16, 2024
Homeक्राइमलग्नाचे आमिष दाखवत दोन वर्ष शारीरिक संबंध, बापलेकाविरुद्ध बलात्कार व ॲट्रॉसिटीचा गुन्हा...

लग्नाचे आमिष दाखवत दोन वर्ष शारीरिक संबंध, बापलेकाविरुद्ध बलात्कार व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

लग्नाचे अमिष दाखवून सन २०२२ ते २४ दरम्यान बारामतीसह पाचगणी व महाबळेश्वर मध्ये जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले व जातीवाचक उल्लेख केला या कारणावरून पिडितेने दिलेल्या तक्रारीवरून बारामती शहर पोलिसांनी बापलेकाविरोधात बलात्कार व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. 

स्वराज्य राष्ट्र
साभार इंटरनेट

याप्रकरणी पोलिसांनी जामदार रोड येथील अक्षय विजय निगडे व त्याचे वडील विजय निगडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा गुन्हा ७ जुलै २०२२ ते ५ मे २०१९ दरम्यान वेळोवेळी घडला. या घटनेतील पीडित फिर्यादी पंचवीस वर्षाची आहे.

पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार या दोन वर्षाच्या दरम्यान अक्षय निगडे याने लग्नाचे आमिष दाखवले व इच्छेविरोधात जबरीने शारीरिक संबंध ठेवला व त्यानंतर तू अमुक जातीची आहे व मी मराठा जातीचा आहे असे सांगून तुझ्याशी लग्न केल्यास माझी समाजात इज्जत राहणार नाही, असे म्हणून अपमान केला व त्याचे वडील विजय निगडे यांनी तू येथून निघून जा नाहीतर तुझ्यावरच केस करून तुला खोट्या केसमध्ये गुंतविल अशी दमदाटी करून हाकलून लावले. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड करत आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!