Tuesday, July 16, 2024
Homeताज्या बातम्यारामकृष्ण हरी...वाजली तुतारी..जल्लोषाने गाजली सणसवाडी उद्योगनगरी

रामकृष्ण हरी…वाजली तुतारी..जल्लोषाने गाजली सणसवाडी उद्योगनगरी

सणसवाडी (ता. शिरूर) येथे राज्यभर चर्चेत व चुरशीची मानल्या शिरूर लोकसभा निवडणुकीमध्ये डॉ अमोल कोल्हे यांच्या विजयोस्तव  फटाकड्यांची आतषबाजी, ढोल, ताशा व तूतारीच्या निनादात रामकृष्ण हरी… वाजली तुतारी… आमदार अशोक पवार …लय भारी…अशा घोषणा देत विजयोस्तव साजरा करण्यात आला. (Shirur Loksabha)

शरद पवार यांच्या सोबत एकनिष्ठ असलेले आमदार अशोक पवार  व उद्योगनगरी सणसवाडी ग्रामस्थांचे  जिव्हाळ्याचे संबंध असून या गावाने पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद चंद्र पवार यांच्या उमेदवार व खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर विश्वास दाखवत खंबीर साथ देत मोठे मतदान केले.(शिरूर लोकसभा)

   संसद रत्न डॉ अमोल कोल्हे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाल्याचे समजताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ सणसवाडी चौकात येत फटाकड्यांची आतषबाजी करत ढोल ताशा व तूतारीच्या गजरात सणसवाडी चौक ते ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज मंदिर अशी विजयी मिरवणूक काढत एकमेकांना पेढे भरवले.यावेळी समस्त ग्रामस्थ सणसवाडी कर मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळी महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती. (Dr Amol Kolhe)

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!