Tuesday, July 16, 2024
Homeक्राइमरात्रीच्या वेळी कालव्यात अल्टो गाडी कोसळून कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू तर...

रात्रीच्या वेळी कालव्यात अल्टो गाडी कोसळून कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू तर नातीला रात्रभर  मृतदेहासोबत बसून काढावी लागली रात्र

नातीच्या वाढदिवसाच्या क्षण साजरा करण्यासाठी गेलेले कुटुंब माघारी येत असताना मारुती अल्टो कारचे नियंत्रण सुटून ताकारी कालव्यात तासगाव मनेराजुरी मार्गावरील चिंचणी हद्दीत  मध्यरात्री कोसळली यात आजोबा आजीसह मुलगी व नातवंडे मृत्युमुखी पडली या वाहनात सहा जणांचा मृत्यू झाला तर ३१ वर्षीय मुलगी सुदैवाने बचावली मात्र रात्रभर तिला कोणतीही मदत मिळाली नसल्याने ती संपूर्ण रात्रभर या मृतदेहांसमवेत गाडीत बसून होती.

या घटनेने मोठी खळबळ उडाली असून या घटनेमध्ये कारच्या पुढच्या भागाचा चुराडा झाला आहे. महामार्गावरून कार थेट कालव्यात कोसळल्याने सर्व जणांचा मृत्यू झाला. सुदैवाने फक्त एक मुलगी बचावली या मृतामध्ये साठ वर्षीय अभियंता राजेंद्र पाटील, त्यांच्या पत्नी सुजाता पाटील, त्यांची मुलगी प्रियंका खराडे, नात ध्रुवा, दोन वर्षीय नात राजवी व एक वर्षीय कार्तिकी यांचा समावेश आहे. या घटनेत राजेंद्र पाटील यांची दुसरी मुलगी तीस वर्षीय स्वप्नाली भोसले या मात्र बचावल्या आहेत.

काल रात्री नात राजवी हिचा वाढदिवस साजरा करून तासगाव येथील अभियंता राजेंद्र पाटील हे अल्टो कारमधून कवठेमहाकाळ तालुक्यातील कोकळे या गावी परत होते. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास गाडीचा अपघात झाला आणि गाडी कालव्यात कोसळली. या घटनेत वरील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. मध्यरात्रीच्या सुमारास गाडी थेट कालव्यात कोसळल्याने व रस्त्यावरून वाहने कमी असल्याने कोणतीही मदत मिळाली नाही. त्यामुळे स्वप्नाली भोसले या गाडीतच बसून होत्या.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!