Tuesday, September 10, 2024
Homeताज्या बातम्याराज ठाकरे यांच्या हस्ते रामदास दरेकर यांची पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड

राज ठाकरे यांच्या हस्ते रामदास दरेकर यांची पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड

कोरेगाव भीमा – सणसवाडी ( ता.शिरूर) येथील नवनिर्वाचित पुणे जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर यांची खुद्द राज ठाकरे यांच्या हस्ते पुणे जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून निवडीचे पत्र देण्यात आले आहे. शिरूर तालुक्यातील व पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील तळागाळातील सच्चा कार्यकर्त्याला न्याय मिळाला असून योग्य जागी योग्य व्यक्तीची निवड असे ग्रामस्थांनी मत व्यक्त केले.

 सणसवाडी येथील  राज ठाकरे यांच्या विचारांना शिरोधार्य माननारे, त्यांच्या विचारांना ग्रामीण भागात विशेषतः शिरूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात पोचवणारे निष्ठावान  कार्यकर्ते व सहकारी म्हणून ओळख असलेले रामदास दरेकर यांचे सर्वसामान्य नागरिकांशी आपुलकीचे नाते आहे.
       महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या स्थापनेपासून पक्षात विविध पदावर काम करत , आपल्या कामाच्या माध्यमातून पक्ष स्थापनेपासून आत्तापर्यंत कार्यकर्त्यांचे जाळे विणले असून सर्वसामान्य माणसांना पदाच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम रामदास दरेकर करत आहेत.

मनसे पक्ष स्थापन झाल्यावर राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन पहिल्याच निवडणुकीत त्यांच्या पत्नी सविता रामदास दरेकर पंचायत समिती सदस्या पदी निवडून येत मनसेच्या राज्यातील पहिल्या पंचायत समिती सदस्या होण्याचा बहुमान मिळवत इतिहास रचला होता.
रामदास दरेकर यांच्या वहिनी सुनंदा नवनाथ दरेकर यांनी उद्योगनगरी सणसवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच भूषवले असून विद्यमान ग्राम पंचायत सदस्य आहेत.

  रामदास दरेकर हे राजकीय ,सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात याचीच पोच पावती म्हणून खुद्द  राज  ठाकरे यांनी मनसे जिल्हाध्यक्षपदी यांची आज निवड करत त्यांच्या हस्ते निवडीचे पत्र दिले . 

याप्रसंगी मनसे नेते राजेंद्र वागस्कर , सरचिटणीस अजय शिंदे, सरचिटणीस बाळा शेडगे, पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, पुणे शहर उपाध्यक्ष हेमंत बत्ते, उपस्थित होते निवड झाल्यानंतर सर्व राजकीय सामाजिक स्तरातून रामदास दरेकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ग्रामीण भागात राज ठाकरे यांचे विचार ग्रामीण भागात पोचण्याविण्यासाठी व मनसे पक्ष विस्तार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम करणार आहे. – नवनियुक्त पुणे जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!