कोरेगाव भिमातिल युनिकॉन क्रिकेट क्लबच्या बेस्ट विकेट किपर म्हणून आदित्य ढेरंगे, बेस्ट फिल्डर आर्यन जगताप, इमर्जिंग प्लेयर म्हणून लावण्या यांना सन्मानित केले.
पुणे – पाचगणी (ता.महाबळेश्वर) येथे मोठ्या उत्साहाच्या व जल्लोषाच्या वातावरणात पार पडलेल्या चार दिवसीय राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये पुण्यातील युनिकॉन क्रिकेट क्लब कोरेगाव, जय शिवराय क्रिकेट अकॅडमी लोणीकंद , एसएनबीपी स्पोर्ट क्लब पुणे आणि पुणे क्रिकेट अकॅडमी वाघोली अशा या चार संघानी यामध्ये सहभाग घेतला होता.यामध्ये पुणे क्रिकेट क्लब विजेता तर कोरेगाव भिमा येथील युनिकॉन क्रिकेट क्लबची चमकदार कामगिरी ठरली आहे.
या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन ‘ द स्पोर्ट फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र यांच्यावतीने आयोजित पाचगणी येथील अंजुमन हायस्कूलमध्ये एक मे ते चार मे खेळण्यात आलेल्या स्पर्धेचे हे ९ वे पर्व होतं.राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत एकूण चार संघांचा सहभागी झाल्यामुळे लीग पद्धतीने खेळण्यात आली.
स्पर्धेतील प्रमुख विजेता संघ पुणे क्रिकेट क्लब तर उपविजेता युनिकॉन क्रिकेट क्लब कोरेगाव असा होता तर तिसऱ्या तिसरा क्रमांक जय शिवराय क्रिकेट अकॅडमी यांना मिळाला तर चौथा क्रमांक एसएमबीपी स्पोर्ट क्लब पुणे यांना मिळाला.
या स्पर्धेमध्ये १२,१४ व १६ वयोगट एकत्रित खेळवण्यात आले. या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन ही ट्रॉफी पुणे क्रिकेट क्लबच्या शाहीन विद्यार्थ्यास मिळाली, बेस्ट बॉलरची ट्रॉफी ही युनिकॉन क्रिकेट अकॅडमीच्या राजवर्धन डफळ याला मिळाली, युनिकॉन क्रिकेट अकॅडमीच्या आदित्य ढेरंगे याला बेस्ट विकेट किपर ची ट्रॉफी मिळाली तर युनिकॉन क्रिकेट अकॅडमीचा खेळाडू आर्यन जगताप याला बेस्ट फिल्डरची ट्रॉफी मिळाली.
या स्पर्धेत मुख्य आकर्षण असलेल्या स्पर्धेमध्ये सर्व खेळाडूंमधून इमर्जिंग प्लेयर असा अवॉर्ड युनिकॉर्न क्रिकेट क्लबच्या लावण्या हिला मिळाला तर जय शिवराय क्रिकेट अकॅडमी चा सर्वात लहान खेळाडू आरव जाधव यालाही बेस्ट इमर्जिंग प्लेयर म्हणून गौरवण्यात आले. तसेच दुसऱ्या क्रमांकाचा बेस्ट बॉलर म्हणून जय शिवराय क्रिकेट ॲकॅडमी चा खेळाडू ध्रु फडतरे याला करण्यात आले तर पुणे क्रिकेट अकॅडमीच्या आरुष यालाही बेस्ट इमर्जिंग प्लेयर म्हणून गौरवण्यात आले. तर या स्पर्धेत एकमेव अर्धशतक ठोकणारा खेळाडू युनिकॉन क्रिकेट क्लबचा रुद्र गव्हाणे होता.
खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन युनियन क्रिकेट क्लबचे कोच प्रताप फडतरे सेत व ऋषिकेश गव्हाणे सर यांनी केले.