रांजणगाव गणपती (ता.शिरूर) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये औद्योगीक वसाहत असल्याने MIDC तील कंपन्यामध्ये अनेक कामगार कामानिमित्त येत असतात. त्यातील काहीजण याठिकाणी दहशत निर्माण करण्याचे काम करत असुन रांजणगाव पोलिसांनी गावठी बनावटीचे एक पिस्टल, जिवंत काडतूस आणि कोयता बाळगल्याप्रकरणी दोन युवकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
सदर गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीकडुन आणखी चार गावठी कट्टे जप्त करण्यात रांजणगाव पोलीसांना यश आले असुन वरिल आरोपीनी सदरचे गावठी कट्टे हे विक्री करीता आणले होते. तसेच त्याची विक्री देखील केल्याची माहीती समोर येत आहे सदरचे गावठी कट्टे विकत घेणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली असुन या गुन्ह्यातील आरोपींची संख्या आठ झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गावठी कट्टे जप्त करण्याची ही परिसरातील पहिली घटना आहे.
यातील आरोपी हा गावठी कट्टे मध्यप्रदेश वरुन विकत आणुन परिसरात विक्री करत होता. त्यास रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी अटक केल्याने त्याच्याकडुन कट्टे विकत घेणा-या अनेकांचे धाबे दणाणले असुन ते सध्या फरार आहे त्यांचा देखिल शोध रांजणगाव एमआयडीसी पोलीस घेत आहे.
सदरची कामगीरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक मितेश गट्टे, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी मुंडे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे, पोलिस हवालदार संतोष औटी, बैजनाथ नागरगोजे, विलास आंबेकर, विजय सरजिने यांनी केली आहे. सदर गुन्ह्यांचा पुढील अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे हे करत आहेत.