पुणे – मोजणीच्या प्रकरणात एका भूकरमापकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हवेली उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालाततील भुकरमापक भुकरमापक दौलत गायकवाड यांच्यासह खाजगी इसम योगेश्वर मारणे यांना बुधवारी (ता. २०) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले आहे.
यातील तक्रारदार यांची देहुगाव येथे जमीन आहे. ती जमीन मोजणीसाठी व क्षेत्राची हद्द ठरवून देण्यासाठी मातील आरोपी क्रं १योगेभार राजेंद्र मारणेयांनी रु. ४,००,०००/- ची लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी ला.प्र.वि. पुणे येथे दिली होती. सदर तक्रारीची ला.प्र.वि. विभागाकडून पंचांसमक्ष पड़ताळणी केली असता, खाजगी इसम आरोपी क्र. २ योगेश्वर राजेंद्र मारणे याने आरोपी क्र. १ दौलत मधुकर गायकवाड यांच्या सांगण्यावरून आ.लो.से.क्र. १ करीता तक्रारदार यांचे वरील काम करून देण्यासाठी रु. ५०,०००/- लाचेची मागणी करत लाचेची रक्कम स्वीकारताना दोघांना ताब्यात घेण्यात आले असूनत्यांचेविरूध्द येरवडा पोलीस स्टेशन येथे वरील प्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे.सदर प्रकरणाचा पुढील तपास ला.प्र.वि. पुणे येथील पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे हे तपास करत आहेत.