Tuesday, July 16, 2024
Homeक्राइमयेरवडा कारागृहात कैद्यांकडून हवालदाराला त्याच्याच काठीने केली जबर मारहाण , मोडले मनगटाचे...

येरवडा कारागृहात कैद्यांकडून हवालदाराला त्याच्याच काठीने केली जबर मारहाण , मोडले मनगटाचे हाड

येरवडा कारागृहात कैद्यांनी नानासाहेब मारणे या हवालदारास त्यांच्याच काठीने केलेल्या मारहाणीत त्यांच्या मनगटाचे हाड मोडले आहे. या प्रकरणी नानासाहेब मारणे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.त्यावरून अपूर्व खंडागळे, सूरज अडागळे, आनंद उपाख्य सोनू धड आणि नीरज ढवळे या बंदीवानांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

येरवडा कारागृहात नवीन यंत्रणा बसविण्याचे काम सुरू असताना कैद्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मात्र, या ठिकाणी जाणाऱ्या कैद्यांना हटवण्यासाठी एका पोलीस हवालदाराला चार कैद्यांनी बेदम मारहाण केली. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास येरवडा कारागृहाच्या नवीन गेटजवळ ही घटना घडली.याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपूर्व संजय खंडागळे, सूरज नारायण अडागळे, आनंद उर्फ सोनू सिद्धेश्वर धाड, नीरज लक्ष्मण ढगाळे अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नानासाहेब रामचंद्र मारणे (वय ५७) यांनी फिर्याद दिली आहे.

येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नानासाहेब मारणे येरवडा कारागृहात तैनात आहेत. येरवडा कारागृहातील मुख्य न्यायाधीश विभागात त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.येरवडा कारागृहातील सी.जे. विभागात दगडी भिंत पाडून नवीन बांधकाम चालू करण्यात आले आहे. मारणे सकाळी गस्तीवर असतांना तेथील कैद्यांना भिंतीचा दगड लागल्यास इजा होईल, असे त्यांनी सांगितले. त्यावरून आरोपी खंडागळे, अडागळे, धाड, ढगाळे यांनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

मारणे यांच्या हातातील काठी हिसकावून आरोपींनी जबर मारहाण केल्यामुळे त्याचा डावा डोळा, डोके, डावा हात व उजव्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली. तसेच डाव्या हाताच्या मनगटालाही फ्रॅक्चर झाले आहे. संबधित आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अहिरे करीत आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!