Tuesday, July 16, 2024
Homeक्राइममोकळ्या जागेवरून झालेल्‍या वादात आई-मुलाची हत्‍या, वडील जखमी

मोकळ्या जागेवरून झालेल्‍या वादात आई-मुलाची हत्‍या, वडील जखमी

तिनशे फूट मोकळ्या जागेचा वाद बेतला जिवावर

अमरावती – सुमारे ३०० फूट मोकळ्या जागेवरून झालेल्या वादातून एका शेजाऱ्याने चक्क शेजारील मायलेकावर सब्बलने हल्ला चढवत त्यांना ठार केले तर वडिलांना जखमी करण्याची धकजदायक घटन सोमवारी दुपारी ४ च्या आसपास मंगलधाम कॉलनीनजीकच्या – बालाजीनगर येथे ती डबल मर्डरची हृद्यद्रावक घटना घडली.(Crime News)

सूरज विजयराव देशमुख (३२) व कुंदा विजयराव देशमुख (६५) अशी मृत माय-लेकांची नावे असून वडील विजयराव देशमुख (७०) हे जखमी झाले. आरोपीचे नाव देवानंद लोणारे (४५, रा. बालाजीनगर) असून मायलेकाचा खून करून तो घराला कुलूप लावत पसार झाला. त्याला रात्री नऊच्या सुमारास माहुली चोर येथील शिवारातून ताब्यात घेण्यात आले.(MURDER)

विजयराव देशमुख व देवानंद लोणारे हे एकमेकांच्या शेजारी राहतात. त्यांच्या दोन घरांच्या मध्ये सुमारे ३०० फूट खुली जागा आहे. त्या लांब व खुल्या पट्टीवजा प्लॉटच्या मागील बाजूस घर बांधले गेल्याने देशमुख व लोणारेंमध्ये त्या जागेच्या कब्ज्यावरून वाद सुरू झाला. लोणारेने अर्ध्यापेक्षा अधिक जागेवर कुंपण टाकले. त्यात झाडे लावली. त्यामुळे तो वाद अधिकच वाढला.विजय देशमुख यांच्‍या शेजारी आरोपी देवानंद आपल्या कुटुंबासह राहतो. त्या दोघांच्या घरांच्‍या मध्ये खुली जागा आहे. या जागेवरून देशमुख व लोणारे यांच्या कुटुंबात वाद सुरू होता.

👉 ACB: ४५ हजारांची लाच घेताना महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला घेताना पकडले रंगेहाथ

सोमवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास याच कारणावरून त्यांच्यात पुन्हा वाद उद्भवला. या वादात लोणारे याने घरातून सब्बल आणून अचानक सूरज यांच्यावर हल्ला चढविला. त्यामुळे विजय व कुंदा हे दोघे मुलगा सूरज याला वाचवायला गेले. त्यावर देवानंदने त्यांच्यावरही हल्ला चढविला. यामध्ये कुंदा, सूरज व विजय हे तिघेही गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले.वाचवा, धावा असा आवाज ऐकून विजयराव घराबाहेर आले. त्यांच्यावर देखील त्याने सब्बलचा वार केला. मात्र, काही शेजाऱ्यांनी धाव घेत त्यांचा जीव वाचविला. त्याचवेळी देवानंद तेथून पसार झाला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांना दिली.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून गंभीर जखमी विजय, कुंदा व सूरज यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी कुंदा व सूरजला यांना मृत घोषित केले, तर विजय यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आरोपी यवतमाळच्या दिशेने, पोलिस होते मागावरआरोपी देवानंद लोणारे (४५) हा शेजारील मायलेकाचा निघृण खून करत घराला कुलूप लावत पळून गेला, पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्याचे घराच्या प्रवेशद्वाराला कुलूप आढळले. पोलिसांनी प्रवेशद्वारावरून आत चढत आरोपीने घरात सोडलेला सब्बल जप्त केला. संबधित प्रकरणाचा तपास पोलीस वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!