Thursday, September 12, 2024
Homeक्राइममाळशेज घाटात दरड कोसळल्याने चुलत्यासह सहा वर्षांचा पुतन्या ठार.

माळशेज घाटात दरड कोसळल्याने चुलत्यासह सहा वर्षांचा पुतन्या ठार.

माळशेज घाटात दरड कोसळली आणि क्षणार्धात मुलगा व नातू आई-वडिलांच्या डोळ्यात देखत मरण पावले दैव बलवत्तर म्हणून आई-वडील आणि थोरला मुलगा यातून बालम बाल बचावला.

कल्याणवरुन अहमदनगरला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग २२२ वर माळशेज घाटात दरड कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. मरण पावलेल्यांमध्ये एका ६ वर्षीय चिमुकल्याचाही समावेश आहे.ही घटना माळशेज घाटातील गणेश मंदिराजवळ घडली.माळशेज घाटातून प्रवास करत असताना रिक्षामध्ये बसलेल्या चुलता पुतण्याच्या अंगावर अचानक मोठा दगड कोसळला यामध्ये ६ वर्षाचा पुतण्या स्वयंम भालेराव आणि  ३७ वर्षीय चुलता राहुल भालेराव हे दोघेजण जागी ठार झाले.

मुलुंडवरुन अहमदनगरला जाताना अपघात – समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील मुलुंड येथील भालेराव कुटुंबीय रिक्षाने अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यामधील चंदनापूर येथे मूळ गावी जात होते. मुरबाड सोडल्यानंतर पुढे टोकावडे पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या घाटरस्त्यावरुन त्यांची रिक्षा जात असतानाच अचानक रिक्षावर दरड कोसळली. या दरडीखाली रिक्षा अडकली. रिक्षातील तिघांनी प्रसंगावधान दाखवत स्वत:चे प्राण वाचवले. मात्र या अपघातामध्ये काका-पुतण्याचा दुर्देवी अंत झाला. या घटनेची माहिती मिळताच टोकावडे पोलीस स्थानकातील कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!