Tuesday, July 16, 2024
Homeताज्या बातम्याडॉक्टरांच्या माणसातल्या देवाला सदैव आमचा सलाम' राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाच्या सरपंच संदिप ढेरंगे यांच्याकडून...

डॉक्टरांच्या माणसातल्या देवाला सदैव आमचा सलाम’ राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाच्या सरपंच संदिप ढेरंगे यांच्याकडून अनोख्या शुभेच्छा

कोरेगाव भिमा ग्राम पंचायत व सरपंच संदीप ढेरंगे यांच्याकडून डॉक्टरांचा अनोखा सन्मान 

कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथील आरोग्य क्षेत्रात सेवा देणाऱ्या आरोग्य रक्षक असणाऱ्या सर्व डॉक्टरांचा ग्राम पंचायतीचे सरपंच संदिप ढेरंगे यांच्यावतीने ‘डॉक्टर डे’ निमित्त सत्कार करण्यात येऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.कोरेगाव भिमा पंचक्रोशीतील नागरिकांची मागील अनेक वर्षांपासून अहोरात्र आरोग्य सेवा करणाऱ्या धन्वंतरीच्या सेवा वारसदारांना कोरेगाव भिमा ग्राम पंचायतीचे सरपंच संदिप ढेरंगे यांनी सन्मानित केले.

   या कार्यक्रमानिमित्त ओंकार हॉस्पिटलचे डॉ प्रकाश शिंदे यांनी समाजाची सेवा करताना अनेक आव्हाने येतात, आरोग्य सेवेचा वारसा व वसा जपताना अनेक संकटांना सामोरे जावे लागते पण मानवता धर्माचे पालन करत आपल्याला दर्जेदार व विश्वसनीय आरोग्य सेवा दिल्याने एक प्रकारे ईश्वराची सेवा करण्याचा लाभ मिळत असतो असे मत व्यक्त केले.

का साजरा केलं जातो डॉक्टर डे – देशातील तत्कालीन सर्वात प्रसिद्ध डॉक्टर डॉ. बिधान चंद्र रॉय जे पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री देखील होते, यांची जयंती आणि पुण्यतिथी १ जुलै रोजी साजरी केली जाते,  वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी देशभरात दरवर्षी 1 जुलैला डॉक्टर्स डे साजरा केला जातो. १९९१ मध्ये भारतात प्रथमच राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करण्यात आला, जो तेव्हाच्या तत्कालीन सरकारने सुरू केला होता. या कार्यक्रम प्रसंगी अण्णासाहेब मगर बँकचे संचालक राजेंद्र ढेरंगे,माजी चेअरमन पंडित ढेरंगे , माजी सरपंच विलास खैरमोडे संजय काशीद ,ग्रामपंचायत सदस्य शरद ढेरंगे, वंदना गव्हाणे, रेखा ढेरंगे, जयश्री गव्हाणे तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहत सदर कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद दिला.

समाजाला अविरत आरोग्य सेवा देणारे डॉक्टर समाजाचे अविभाज्य अंग असून त्यांच्या सेवेमुळे अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण होऊन शारीरिक वेदना कमी करण्यासह समाजाला सुदृढ आरोग्य देण्यासाठी मोलाचा वाटा आहे.माणसातल्या देवाला सदैव आमचा सलाम’ राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाच्या शुभेच्छा मनःपूर्वक शुभेच्छा. – सरपंच संदिप ढेरंगे, ग्राम पंचायत कोरेगाव भिमा.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!