कोरेगाव भिमा – वाघोली (ता.शिरूर) येथे पंचवीस वर्षांपूर्वी शिक्षण घेतलेल्या अनेक माजी विद्यार्थिनींनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत कॉलेजमध्ये माजी विद्यार्थिनी महिला स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता.
मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी माजी विद्यार्थिनी डॉ. सारिका बहिरट म्हणाल्या, प्रत्येक स्त्रीमध्ये अनेक कला गुण दडलेले असून आज त्याचे प्रकटीकरण होताना सर्वत्र दिसत आहे म्हणूनच त्या सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. तर ज्येष्ठ समाजसेविका मंदाताई यांनी, प्रत्येक पुरुषाच्या जीवनात स्त्रियांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून ती मुलगी, बहीण, पत्नी व आई अशी चतुरंग भूमिका निभावित असते.
राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, प्रशासकीय व खेळ अशा विविध क्षेत्रात उंच भरारी घेणाऱ्या बीजेएस काॅलेजच्या माजी विद्यार्थिनींचा सन्मान केला. त्यावेळी शिक्षण घेत असताना येणाऱ्या समस्यांना कशा पद्धतीने तोंड देत शिक्षण घेतले त्याबद्दलची व्यथा अनेक विद्यार्थीनींनी मनोगतनातून उलगडून दाखविली.
मनोरंजन कार्यक्रमातील खेळ खेळत मुलींनी आनंद घेतला.कार्यक्रमाच्या प्रसंगी डॉ. माधुरी देशमुख, डॉ. एस. व्ही. गायकवाड, डॉ. डी. एन. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. भूषण फडतरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सहदेव चव्हाण यांनी तर आभार स्वाती पाचुंदकर यांनी मांडले. कार्यक्रमाचे नियोजन डॉ. भूषण फडतरे, डॉ. मनीषा बोरा, डॉ. रमेश गायकवाड, डॉ. ज्योती थोरात, प्रा. हनुमंत जगताप, प्रा. सुवर्णा पाटील, गिरीश शहा, म्हस्कू शिंगाडे, कुसुम दुबे, मयूर भुजबळ, कुणाल बेंडभर, आशिष शिंदे व विनय ढमढेरे यांनी केले.