Tuesday, July 16, 2024
Homeक्राइममहिला वीज कर्मचाऱ्याच्या क्रूर हत्येनंतर.. मोरगांव वीज उपकेंद्राला महावितरणकडून तातडीने सुरक्षारक्षक नेमत...

महिला वीज कर्मचाऱ्याच्या क्रूर हत्येनंतर.. मोरगांव वीज उपकेंद्राला महावितरणकडून तातडीने सुरक्षारक्षक नेमत बसवले सीसीटीव्ही

बारामती – किरकोळ वीजबिलावरुन एका महिला वीज कर्मचाऱ्याची क्रूरपणे हत्या झाल्याची घटना महावितरण बारामती परिमंडलात घडली आहे. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी महावितरण प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली असून, मोरगाव शाखा कार्यालयाला तातडीने सुरक्षा रक्षक नेमले आहेत. तसेच सीसीटीव्ही बसविण्याचे आदेशही मुख्य अभियंता सुनिल पावडे यांनी दिले आहेत. 

मोरगावच्या घटनेमुळे वीज कर्मचाऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून असुरक्षेची भावना तयार होत आहे. त्यासाठी संघटना प्रतिनिधींकडून वीज उपकेंद्रांना सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी केली होती. त्यानुषंगाने मुख्य अभियंता सुनिल पावडे यांनी अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील यांना मोरगाव उपकेंद्राला तातडीने तीन सुरक्षा रक्षक देण्याचे आदेश दिले. तीन पाळीमध्ये प्रत्येकी एक प्रमाणे ही सुरक्षा असणार आहे.

तसेच मोरगाव शाखा व उपकेंद्राला सीसीटीव्ही बसविण्याचे कामही शनिवारी सकाळी सुरू करण्यात आले आहे. याशिवाय परिमंडलातील संवेदनशील उपकेंद्राची माहिती गोळा करण्याचे निर्देश सुद्धा मुख्य अभियंता पावडे यांनी दिले आहेत. 

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!