Tuesday, July 16, 2024
Homeइतरमहावितरण फलटण शहर उपविभागातर्फे कर्मचाऱ्यांना सुरक्षेचे धडे

महावितरण फलटण शहर उपविभागातर्फे कर्मचाऱ्यांना सुरक्षेचे धडे

सातारा – महावितरण प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र सांगली व फलटण शहर उपविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण शहर उपविभागातील सर्व तांत्रिक कर्मचाऱ्यांसाठी नुकतेच सुरक्षा शिबीर घेण्यात आले. यामध्ये दैनंदिन कामे करताना घ्यावयाची सुरक्षा व सुरक्षेच्या नियमांबाबत वीज कर्मचाऱ्यांना धडे देण्यात आले.

सांगली प्रशिक्षण केंद्राचे अति. कार्यकारी अभियंता श्री. राजेश वायदंडे यांनी काम करताना कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या नजरचुकीमुळे किंवा निष्काळजीपणाने घडत असलेल्या अपघातांबाबत व त्यामागील कारणांचे विश्लेषण केले. जनमित्रांनी सुरक्षितरित्या वीज वाहिन्यांवर कामे करून आपले तसेच ग्राहकांचे जीवन सुरक्षित होईल याची दक्षता घ्यावी. वीज अपघात होऊ नये याकरिता घ्यावयाची काळजी, लाईन परमीट, अर्थिंगचे महत्व, डिस्चार्ज रॉड वापरताना घ्यावयाची काळजी याबाबत वायदंडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच आत्तापर्यंत झालेल्या पाच विद्युत अपघाता मधील विश्लेषण व क्रमवारपणे झालेल्या चुका तसेच सदर चुका होऊ नयेत म्हणून घेता येण्यासारखी काळजी याबद्दलही त्यांनी माहिती दिली.

प्रशिक्षणात ‘माझी सुरक्षितता – माझी जबाबदारी’ यावर भर देण्यात आला. तसेच विद्युत सुरक्षिततेची सामुहिक प्रतिज्ञाही सर्वांनी घेतली. डिस्चार्ज रॉड किंवा शॉर्टिंग रॉडचा न चुकता वापर करणे. यासोबतच चालू वर्षात ‘शुन्य अपघाता’चे उद्दिष्ट ठेवण्यात आले. शिबीराच्या यशस्वीतेसाठी अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रकाश देवकाते व गणेश जमाले यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाला शहर उपविभागातील शाखा अभियंते, वीज कर्मचारी, व कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!