Tuesday, July 16, 2024
Homeकृषिमहाराष्ट्रातील जनता परिवर्तन करण्याच्या मनस्थितीत ; आमच्यावर टीका केल्यानं अंगाला भोकं पडत...

महाराष्ट्रातील जनता परिवर्तन करण्याच्या मनस्थितीत ; आमच्यावर टीका केल्यानं अंगाला भोकं पडत नाहीत -शरद पवारांनी मोदींना सुनावलं

ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने हाती घेतलेली आहे – डॉ अमोल कोल्हे

उरुळी कांचन (ता.हवेली) महाराष्ट्रात लोकांची मनस्थिती परिवर्तन करण्याची आहे. दहा वर्षात देशाचा कारभार करण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे होती, त्यांची काम करण्याची पध्दत पाहून लोक अस्वस्थ आहेत.देशाच्या संविधानाला कोणीही धक्का लावू शकत नाही, हे दाखवून देण्याची ताकद सर्वसामान्यांमध्ये आहे, असे प्रतिपादन जेष्ठ नेते खासदार शरद पवार (Sharad Pawar)यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) कधी पंडित जवाहरलाल नेहरूंवर टीका करतात. तर कधी आमच्यावर टीका केल्याशिवाय त्यांना झोपच लागत नाही. कधी माझ्यावर, कधी उद्धव ठाकरेंवर ( Uddhav Thackeray ) तर कधी राहुल गांधींवर ( Rahul Gandhi ) पंतप्रधान मोदी टीका करत असतात. आमच्यावर टीका करा, आमच्या अंगाला काही भोक पडत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर घणाघात केला.

उरुळी कांचन येथे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत पवार बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, जिल्ह्याध्यक्ष जगन्नाथ शेवाळ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड, काँग्रेसचे देवदत्त भन्साळी ,विकास लवांडे, सक्षणा सलगर, प्रा. के. डी. कांचन, माधव काळभोर, प्रताप गायकवाड, प्रकाश म्हस्के, सचिन आहेर, देविदास भन्साळी, शरद पवार गटाचे हवेली तालुकाध्यक्ष संदीप गोते तसेच पदाधिकारी , कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

भाजपला संसदीय लोकशाही मान्य नाही. या पक्षाशी संबंधित खासदार भाजपला संसदीय पद्धत रद्द करण्याची भाषा बोलत आहे. या देशाची घटना संकटात आणण्याचे काम केलं जात आहे, या देशाची घटना बदलण्याचे काम त्यांना करायचे आहे, आणि म्हणूनच ४०० पार चा नारा ते देतायेत.त्यासाठी भाजपला ४०० संख्याबळ आवश्यक आहे. हे संख्याबळ मिळाले तर मोदी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला घालून दिलेली घटना व संविधान बदलण्याचा प्रयत्न करतील असा थेट निशाणा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर साधला आहे. पण तुमच्या माझ्या हातात आहे की कोणीही घटनेला धक्का देऊ शकत नाही हे दाखवून देण्याची ही वेळ आहे, असेही पवार म्हणाले.

शेतकऱ्यांना त्याच्या घामाची किंमत मिळत नाही – यापुढे शरद पवार म्हणाले की, गेली काही दिवस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हिंडतोय. जनतेच्या मनात काय आहे हे समजलं. कधी नव्हे इतका शेतकरी अस्वस्थ आहे. शेतकऱ्यांना त्याच्या घामाची किंमत मिळत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या दहा वर्षाच्या राज्यात शेतीसाठी काय केलं असा सवाल करत पवार म्हणाले की, आज या देशातली शेती संकटात आली आहे. या सरकारच शेतीवरच लक्ष कमी होत आहे, आत्महत्या वाढायला लागल्यात मी कृषी खात १० वर्ष सांभाळले,नंतर मोदींचे राज्य आले..माझ्या काळात शेतकरी हिताचे निर्णय घेतले,मात्र मोदींच्या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या.

दहा वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही –सत्ता ही लोकांसाठी वापरायची असते, पण आज काय सुरु आहे, असे सांगत पवार पुढे म्हणाले की, या देशाचा कारभार हुकूमशाही पध्दतीने सुरु आहे. मोदींचा संसदीय लोकशाही पद्धतीवर विश्वास नाहीये,विरोधकांवर त्यांचा विश्वास नाहीये. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना,पत्रकारांना सामोरे जायचे,मोदींनी ही दहा वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही.

पंतप्रधानांनी पदाची किंमत ठेवली नाही – मनमोहन सिंग पंतप्रधान असताना वर्षभराचा कामकाजाचा लेखाजोखा हे पत्रकार परिषद घेऊन सांगत असे. आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात एकदाही पत्रकार परिषद घेतलेली नाही.आपल्या देशाचा कारभार हुकूमशाहीच्या मार्गावर आहे. याचा अर्थ आपल्या देशाच्या संविधानावर संकटाचे ढग दिसू लागले आहे. देशाचे दिवंगत पंतप्रधान यांच्यावर टीका करतात, टीका करा यामुळे आम्हाला अंगाला भोक पडत नाही. परंतु, पंतप्रधान ही एक संस्था आहे, या पदाची तरी किंमत ठेवली नसल्याची सडकून टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्र हा लढणा-यांच्या मागे उभा राहतो. जो लढतो त्यांच्या सोबत असतो. म्हणून आमचा मतदारसंघ आमच्या सोबत ठामपणे उभा आहे. आम्ही लाचारी स्वीकारत नाही. महाराष्ट्रातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवायचा आहे. भैरोबा नाला ते चौफुला अशा उड्डाण पुलाचे नियोजन करण्यात आले आहे. अजूनही बरेचसे प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी तत्वांवर ठाम असणारे आपले उमेदवार निवडून द्या.

यावेळी सभेत बोलताना उमेदवार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार आहे. ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने हाती घेतलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी येतात परंतु ते छत्रपती शिवरायांना वंदन करण्यासाठी येत नाही.

आढळराव म्हणतात,२०१९ चा बदला घ्यायचाय तर कधी ही शेवटची निवडणूक आहे. हे सगळं मी, माझ, माझ्यासाठी यापेक्षा देशासाठी निवडणूक आहे. देशातील महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळण्याचा प्रश्न सुटणार नाही.ही निवडणूक सर्वसामान्य लोकांनी हातात घेतली असल्याचे जाणवते. ते सांगतात आमच्याकडून जास्त लीड असेल.

शिरूर -हवेलीचे आमदार अशोक पवार म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे दूरदृष्टी नेतृत्व आपल्या सर्वांना लाभलेले आहे. त्यांनी पुन्हा एकदा आपल्याला सक्षम उमेदवार दिलेला आहे. जो आपल्या पक्षाशी एकनिष्ठ असून ज्यांनी लोकसभा गाजवली आहे. तसेच ते संसदेमध्ये कांदा प्रश्न, दूध दर वाढ, सर्वसामान्यांचे प्रश्न मांडतात. उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असेही ते बोलताना म्हणाले.

ज्या माणसाने आपल्याला या पदापर्यंत पोचवले त्या रूनाची परतफेड पडणे होत नसते.आम्ही निष्ठेने पवार साहेबांसोबत आहोत.भाजपने शेतकऱ्यांची वाट लावली.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!