हेमंत पाटील (सातारा)
सातारा – मंथन परीक्षा २०२३-२४ या परीक्षेत मदर तेरेसा इंग्लिश मेडीयम स्कुल, माळवाडी (मसूर), ता. कराड, जि. सातारा येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.असून दुर्गम व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या यशाचे महत्व वैशिष्टयपूर्ण असून मेहनत, जिद्द व अचूक मार्गदर्शन यामुळे हे साध्य झाले आहे.
या परीक्षेचा निकाल पुढीलप्रमाणे इ. १ ली – अर्जित सुहास बोराटे(राज्यात २४ वा, जिल्ह्यात १९ वा आणि केंद्रात २ रा, इ.२ री -अर्णव प्रशांत इंगवले(राज्यात २४ वा ,जिल्ह्यात १८ वा आणि केंद्रात-१ला, सिद्धी सिद्धराय सूर्यवंशी २६ वी, जिल्ह्यात- २० वी आणि केंद्रात-२ री, इ. ३ री श्रवण जगदीश चव्हाण – राज्यात ६३ वा, जिल्ह्यात ५७ वा आणिकेंद्रात-१ला, चैतन्य शिवदास जाधव राज्यात ८९ वाजिल्ह्यात ८३ वा आणि केंद्रात २ रा, इ.४ थी हुदा खुदास मोमीन – राज्यात७७ वी, जिल्ह्यात ७२ वी आणि केंद्रात१ ली, अनुजा सोमनाथ जाधव राज्यात ७७ वी, जिल्ह्यात७२ वी आणि केंद्रात १ ला, सर्वेश अमोल जाधव, राज्यात७९ वा,जिल्ह्यात ७४ वा आणिकेंद्रात २ रा, इ. ५वी मुग्धा अधिकराव पाटील ,राज्यात ७३ वीजिल्ह्यात ६८वी आणि केंद्रात १ ली, इ.६ वी शर्वरी अमोल जाधव राज्यात ८० वी, जिल्ह्यात ७१ वी आणि केंद्रात १ली, इ.८ वी अनुजा शिवदास जाधव राज्यात ६७ वी ल, जिल्ह्यात ५५ वी आणि केंद्रात १ ली, श्रुतिका दत्तात्रय माळी राज्यात ६७ वीजिल्ह्यात ५५ वी आणि केंद्रात १ ली या विद्यार्थी व विद्यार्थिनींना मंथन परीक्षे मध्ये मिळवलेल्या नेत्रदिपक यशामुळे मदर तेरेसा माळवाडी अशा दुर्गम भागातील शाळेचा नावलौकीक हा पूर्ण तालुक्यासह सातारा जिल्ह्यात होत आहे.