Tuesday, July 16, 2024
Homeइतरबी जे एस मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

बी जे एस मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

वाघोली (ता.हवेली) भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाघोली येथे सकाळी  योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी  प्रा. राकेश वांजोळे सर यांनी योगा बाबत माहिती देत योगाची आठ अंगे सविस्तरपणे समजावून सांगितल्यानंतर योगासने व प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आली. 

  यावेळी प्रा. राणी कळमकर यांनी पतंजली ऋषींना वंदन करून योगा अभ्यासाची सुरुवात केली. यावेळी विद्यार्थ्यांकडून काही योगासनाचे प्रकार व ओमकार, भ्रामरी, भास्रिका, अनुलोम विलोम,कपालभाती यासारखे प्राणायामाचे प्रकार तसेच ध्यान घेतले, व शांती मंत्राने योगपाठाची सांगता केली. योग अभ्यास करत असताना सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी स्वतः आसने व प्राणायाम करून उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. 

  यावेळी योगशिक्षक राणी कळमकर व क्रीडाशिक्षक राकेश वांजळे, सूर्यकांत दुधभाते यांचा सिंह मॅडम आणि उपप्राचार्य गेठे सर यांनी सन्मान केला. यानंतर सूर्यकांत दुधभाते सर यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.

 या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य संतोष भंडारी, उपप्राचार्य गेठे सर सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राणी कळमकर यांनी केले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!