Tuesday, July 16, 2024
Homeताज्या बातम्याबी.जे.एस माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात  पुष्पवृष्टी करत अनोखे स्वागत

बी.जे.एस माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात  पुष्पवृष्टी करत अनोखे स्वागत

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीवर लक्ष देत सुसंस्कारित  आदर्श नागरिक घडवणार –  प्राचार्य  संतोष भंडारी

वाघोली (ता.हवेली) येथील भारतीय जैन संघटनेच्या माध्यमिक विद्यालयात ढोल ताशा, पुष्पवृष्टी व लेझीमच्या गजरामध्ये विद्यार्थ्यांचे  पहिल्या दिवशी उत्साहाच्या व जल्लोषाच्या वातावरणात स्वागत स्वागत करण्यात आल्याने विद्यार्थी भारावून गेले होते.तसेच यावेळी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीवर लक्ष देत सुसंस्कारित  आदर्श नागरिक घडवणार असल्याचे प्रतिपादन प्राचार्य  संतोष भंडारी यांनी केले.

 वाघोली येथील भारतीय जैन संघटना माध्यमिक विद्यालयात ढोल ताशा व लेझीमच्या गजरामध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषाच्या वातावरणात सर्वप्रथम विद्यार्थ्यांना औक्षण करत  पुष्पवृष्टी करण्यात आली.  विद्यार्थी प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने  प्रवेशद्वारावर फुग्यांच्या कमानी व रांगोळीच्या  पायघड्या  घालून विद्यार्थ्यांचे  जंगी स्वागत करण्यात आले.नवप्रविष्ठ विद्यार्थ्यांचे  पुस्तके आणि गुलाब पुष्प  देऊन पाहुण्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी वाघोली केंद्राचे केंद्रप्रमुख अंकुश बढे, पालक कार्यकारणी  उपाध्यक्ष बापूसाहेब कुटे, पालक कार्यकारणी सदस्य नितीन वारघडे तसेच विद्यालयाचे प्राचार्य  संतोष भंडारीपर्यवेक्षक पांडुरंग पवार, शिक्षक वृंद आणि मोठ्या संख्येने  पालक  उपस्थित होते. 

 कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून विद्यालयाच्या  कार्याचा आढावा घेताना प्राचार्य संतोष भंडारी यांनी पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश विद्यालयात घेतल्याबद्दल आभार व्यक्त करत धन्यवाद देत विद्यालयात राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वच शिक्षक व संस्था प्रयत्नशील राहणार असल्याचे पालकांना सांगितले.

  यावेळी काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक पाटील तर आभार प्रदर्शन  योगिता देवडकर यांनी केले. 

 या देशाचा भविष्यातील भक्कम पाया म्हणजे ही पिढी आहे.यांना सुसंस्कारित करण्यासह आदर्श नागरिक घडवण्यासाठी प्रयत्न करणार असून यामाध्यमातून सक्षम व समृद्ध भारत घडणार आहे.यासाठी विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्न करणार आहे.-  प्राचार्य संतोष भंडारी

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!