Tuesday, July 16, 2024
Homeइतरबकोरी येथील जय मल्हार वि. का.स.सोसायटीच्या पहिल्या महिला चेअरमन स्वाती भाऊसाहेब वारघडे...

बकोरी येथील जय मल्हार वि. का.स.सोसायटीच्या पहिल्या महिला चेअरमन स्वाती भाऊसाहेब वारघडे यांची बिनविरोध निवड

  व्हॉईस चेअरमन पदी संजय शितकल यांची बिनविरोध निवड

हवेली तालुक्यातील बाकोरी येथील जय मल्हार विविध कार्यकारी विकास सोसायटीची चेअरमन व व्हाएस चेअरमन पदाची निवडनुक बिनविरोध होऊन सोसायटीच्या पहिल्या महिला चेअरमन म्हणून स्वाती भाऊसाहेब वारघडे यांची  तर व्हॉईस चेअरमन पद संजय शितकल यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

   मल्हार विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या चेअरमन व व्हॉईस चेरमन पदाचा संजय वारघडे आणि अलका वारघडे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेची निवडणूक घेण्यात आली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून देसाई मॅडम यांनी कामकाज बघितले तर त्यांना निवडणूक प्रक्रियेत संस्थेचे सचिव दहिफळे भाऊसाहेब यांनी सहकार्य केले. 

 नवीन नियुक्तीसाठी एक-एकच अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी यांनी दोन्ही जागा बिन- विरोध घोषित करून त्यांना पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या. 

  याप्रसंगी संस्थेचे जेष्ठ संचालक मार्गदर्शक विकास उंद्रे यांनी ही मार्गदर्शन केले. नवनियुक्त पदाधिकारी आणि संचालक  मंडळाला ग्रामस्थांच्यावतीने जेष्ठ संचालक माजी उपसरपंच सुभाष  वारघडे व प्रल्हाद वारघडे यांनी शुभेच्छा दिल्या. 

यावेळी बकोरीचे सरपंच सत्यवान गायकवाड, माजी उपसरपंच संतोष वारघडे, माजी उपसरपंच शांताराम वारघडे, माजी उपसरपंच म्हस्कु बहिरट, माजी उपसरपंच दत्तात्रय  वारघडे, माजी चेअरमन बाळासाहेब वारघडे, माजी चेअरमन दत्तात्रय वारघडे, माजी चेअरमन संजय बाळकृष्ण वारघडे, माजी व्हा.चेअरमन, अलका वारघडे, पोलीस पाटील सीमा प्रल्हाद वारघडे, संचालक संतोष महादेव वारघडे, भाऊसाहेब वारघडे,संजय बबन वारघडे, सागरशेठ वारघडे, रोहिदास शितकल, संतोष वारघडे, समीर वारघडे इतर ग्रामस्थांनी शुभेच्छा व सदिच्छा दिल्या. बिनविरोध निवडणूक प्रक्रिया पारपडल्याने सर्व संचालक व अधिकारी यांचे आभार भाऊसाहेब दत्तात्रय वारघडे यांनी मानले.

आमच्या कार्यकाळात शेतकरीहिताचे निर्णय घेण्यासह  वसुली वाढविण्यासाठी योग्य प्रयत्न करणार -नवनियुक्त चेअरमन स्वाती भाऊसाहेब वारघडे व व्हाइस चेअरमन संजय शितकल

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!