Tuesday, July 16, 2024
Homeक्राइमप्रियकराने प्रेयसीचा भर रस्त्यात केला खून, जीव गेल्यावरही मारत राहिला...एकच वाक्य वारंवार...

प्रियकराने प्रेयसीचा भर रस्त्यात केला खून, जीव गेल्यावरही मारत राहिला…एकच वाक्य वारंवार उच्चारत होता

प्रियकराने आपल्या प्रेयसीला भर रस्त्यात जिवंत मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने पान्ह्याने तरूणीवर हल्ला करत तिला जागेवरच संपवलं. घटना घडली त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्यांनी तरूणीला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही.त्यानंतर मृतदेहाजवळ बसून तो एक गोष्ट वारंवार बोलत होता.(Crime News)

तरुणाच्या हातात लोखंडी पाना होता. त्याने तरुणीच्या डोक्यात वार केले. घाव वर्मी बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेल्या तरुणी शेजारी बसून तिला तू असं का केलंस? असं विचारत होता. सतत हा प्रश्न विचारल्यानंतर पुन्हा एकदा त्याने तिच्या डोक्यात वार केला.(Crime)

आरोपी रोहित यादव हा नालासोपारा येथील आहे. रोहित आणि आरती दोघांच एकमेकांसोबत प्रेमसंबंध होते, मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये भांडण सुरू होतं. आरोपी रोहित याला आरती इतर मुलांसोबत बोलत असल्याचा संशय होता.

आरती यादव गेल्या महिन्यात वसई येथील एका कंपनीमध्ये कामाला लागली होती. मंगळवारी सकाळी आरती कामावर जाण्यासाठी गेली, तेव्हा रोहितने तिला गावपाडा येथील स्टेट बँकसमोर आरतील अडवलं. सकाळी ८.३० च्या सुमारास ही घटना घडली.

दोघांमध्ये शाब्दिक चमकमही झाली त्यानंतर रोहितने त्याच्याजवळ असलेला पान्हा काढला आणि आरतीच्या डोक्यावर हल्ला केला. आरतीवर तो पान्ह्याने वार करत राहिला, रक्ताच्या थारोळ्यात ती पडली होती त्यानंतर तो पळून न जाता तिथेच बसून राहिला. रोहितने तिला मारल्यावर आरतीच्या मृतदेहाजवळ बसून तो तिला, क्यू किया, क्यू किया ऐसा? असं बोलत होता. पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!