Thursday, September 12, 2024
Homeताज्या बातम्यापुण्यात मुलींच्या वस्तीगृहाला भीषण आग..एकाचा गुदमरून मृत्यू ४० मुलींची सुखरूप सुटका

पुण्यात मुलींच्या वस्तीगृहाला भीषण आग..एकाचा गुदमरून मृत्यू ४० मुलींची सुखरूप सुटका

पुणे -सदाशिव पेठेतील निलया इन्स्टिट्यूट या खासगी संस्थेत मध्यरात्री आग लागली. संस्थेच्या आवारातील कार्यालयात झाेपलेल्या वसतिगृह व्यवस्थापकाचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. इमारतीत अडकलेल्या ४० मुलींची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.( pune)

मिळालेल्या माहितीनुसार, सदाशिव पेठेतील बॅ. गाडगीळ रस्त्यावर निलया इन्स्टिट्यूट आहे. या संस्थेकडून वाणिज्य विषयक अभ्यासक्रम चालविले जातात. संस्थेची तीन मजली इमारत असून, तेथे बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा आहे. मध्यरात्री दीडच्या सुमारास संस्थेत आग लागली. आग भडकल्याने त्याची झळ वसतिगृहातील खोल्यांपर्यंत पोहाेचली. मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याने परिसरात घबराट उडाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तीन बंब, टँकर, रेस्क्यू व्हॅन घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तातडीने पाण्याचा मारा सुरू केला. या दुर्घटनेत सागर कुलकर्णी या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.(पुणे)

शैक्षणिक संस्थेच्या इमारतीच्या खालच्या मजल्यावर अभ्यासिका आहे तर दुसऱ्या मजल्यावर स्टडी रुम आणि इतर मजल्यावर मुलींच्या राहण्याची सोय केली होती.(Pune) गुरुवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. सदर घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी काही वेळातच आग विझवली. आग लागलेल्या इमारतीत ४० मुली राहत होत्या. आग लागल्यावर तळमजल्यावर राहणाऱ्या मुलींनी टेरेसवर धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांची सर्व मुलींना बाजूच्या इमारतीवरुन शिडीच्या साहाय्याने बाहेर काढले. मात्र, या ठिकाणी काम करत असलेल्या व्यवस्थापकाचा गुदमरुन मृत्यू झाला.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!