Tuesday, July 16, 2024
Homeक्राइमपुण्यातील वाघोली शाळेतील धक्कादायक प्रकार..."तुला पिक्चर दाखवतो टॉयलेटमध्ये चल.." १०वर्षाच्या मुलावर लैंगिक...

पुण्यातील वाघोली शाळेतील धक्कादायक प्रकार…”तुला पिक्चर दाखवतो टॉयलेटमध्ये चल..” १०वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचाराचा शिपायाकडून प्रयत्न..

कोरेगाव भिमा – वाघोली (ता.हवेली)  येथील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर शाळेतील शिपायाने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून. या प्रकरणी पिडीत मुलाच्या आईच्या तक्रारीवरून लोणीकंद पोलीस ठाण्यात पॉक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचाराबाबत कोणाला काही न सांगण्याची धमकी आरोपीने दिली होती. त्यामुळे पीडित मुलगा घाबरला होता. (Pune Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा १० वर्षीय मुलगा हा वाघोलीमध्ये असलेल्या एका नामांकित शाळेत आहे. १९ एप्रिल रोजी फिर्यादी यांनी मुलाला शाळेमध्ये सोडल्यानंतर आरोपीने पिडीत मुलाला त्याचे नाव विचारले. त्याच्याशी गोड बोलून त्याला ‘तूला चित्रपट आवडतात का?’असे विचारले. पीडित मुलाने हो उत्तर दिल्यानंतर आरोपीने टॉयलेटमध्ये चल… मी तुला एक फिल्म दाखवतो असे म्हटले. पिडीत मुलाने त्यांना नकार दिला. मात्र आरोपीने ‘इथले सगळे कॅमेरे बंद आहेत तू काही काळजी करू नकोस कोणाला काही समजणार नाही” असं सांगितलं आणि त्याच्यावर जबरदस्ती करू लागले.या कृतीला घाबरून पिडीत मुलगा तेथून पळून गेला.

तो पुन्हा वर्गात आला आणि अश्लील वेबसाईट दाखवली – आरोपीच्या या कृतीला घाबरून पिडीत मुलगा पळून गेला. थोड्या वेळाने आरोपी पुन्हा वर्गात येऊन “तुला इथेच फिल्म दाखवतो” असे बोलून त्यांनी मोबाईल मध्ये एक अश्लील वेबसाईट दाखवली आणि कोणाला काही सांगू नको अशी धमकी दिली. पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात या संपूर्ण प्रकरणी पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकंदरीत पालकवर्गही या प्रकारामुळे धास्तावले आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!