Tuesday, September 10, 2024
Homeक्राइमपुण्यातील राजगुरूनगरमध्ये अल्पवयीन मुलींना ड्रगचे इंजेक्शन देऊन बियर व दारू पाजत...

पुण्यातील राजगुरूनगरमध्ये अल्पवयीन मुलींना ड्रगचे इंजेक्शन देऊन बियर व दारू पाजत रात्रभर केला अत्याचार..

खेड तालुक्यातील राजगुरू नगरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून तीन युवकांनी ओळखीच्या असलेल्या दोन अल्पवयीन मुलींना विश्वासात घेऊन ड्रगचे इंजेक्शन दिले. तसेच लॉजवर नेऊन बिअर आणि दारू प्यायला देऊन सलग रात्रभर त्या अल्पवयीन मुलींचे अक्षरशः लचके तोडल्याचा भयानक आणि किळसवाणा प्रकार खेड तालुक्यात घडला असल्याचे समोर आले आहे.

तिघा आरोपींविरोधात खेड पोलीसांनी पॉस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.दोघेजण ताब्यात घेतले असून मुख्य सुत्रधार फरार आहे.यातील एक युवक अल्पवयीन आहे. फरार असलेला प्रमुख आरोपी हा ड्रग पुरवणारा सुत्रधार असुन त्याच्याकडून आत्तापर्यंत किती जणांना ड्रग पुरवले? याबाबतीत पोलिस माहिती घेत आहेत.

दरम्यान, मंगळवारी (दि १४) रात्री हा प्रकार घडला. बुधवारी सकाळी नशेत झिंगून घरी परत आल्यावर मुलींच्या पालकांच्या लक्षात ही बाब आली अन प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.राजगुरुनगर शहर परिसरात वास्तव्य असलेली आणि महाविद्यालयात शिकत असलेली ही मुले,मुली आहेत. त्यांच्या या प्रकाराची माहिती बाहेर आल्यानंतर अशा वयातील मुलांच्या पालकांमध्ये चिंता आणि भितीचे वातावरण पसरले आहे.

गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही महत्त्वाचा तपास सुरू आहे. सर्व प्रकारा बाबत सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात येईल असे पोलिस निरिक्षक राजकुमार केंद्रे यांनी सांगितले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!