Tuesday, July 16, 2024
Homeक्राइमपुणे हादरले ! आंबेगाव तालुक्यात दोन मावस बहिणींवर सामूहिक बलात्कार..अत्याचाराचा व्हिडिओ केला...

पुणे हादरले ! आंबेगाव तालुक्यात दोन मावस बहिणींवर सामूहिक बलात्कार..अत्याचाराचा व्हिडिओ केला रेकॉर्ड 

दोन अल्पवयीन मुलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल

आंबेगाव – पारगाव कारखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील दोन अल्पवयीन मावस बहिणीवर चार जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

सदर आरोपींनी मुलींवर अत्याचार केल्याचा व्हिडिओ काढून तो व्हिडिओ दुसऱ्याला दिला व त्याने तो व्हिडिओ त्यातील एका अल्पवयीन मुलीला दाखवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.(Crime News)

या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह एकुण पाच जणांवर पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पीडित मुलीच्या आईने पारगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.(Latest News)

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावात दोन अल्पवयीन सख्ख्या मावस बहिणी घरात एकट्या असताना अवधूत राजू पंचरास, कुणाल कैलास बोऱ्हाडे , दोन अल्पवयीन मुले यांनी घरात घुसून दरवाजाला आतून कडी लावली. यानंतर त्यांनी पीडित मुलींना जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. तसेच सदर आरोपींनी मुलींवर केलेल्या अत्याचाराचा व्हिडिओ तयार करून तो महेश सुभाष तांबे याला दिला होता. त्यानंतर महेश तांबे याने तो व्हिडिओ त्यातील एका मुलीला दाखवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यातील काही संशियाताना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे व पारगाव पोलीस करत आहे.(Pune)

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!