पुणे – राज्यात होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत असून यामुळे सर्वसामान्य जनतेचा जीव टांगणीला लागला असून रस्त्यावरून प्रवास करताना त्यांना अगदी जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे . पुणे-सोलापूर महामार्गालगत लोणी काळभोर गुलमोहर लॉन्स येथे एक होर्डिंग कोसळले आहे. त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र एक घोडा जखमी झाला आहे.त्यामुळे होर्डिंगचा विषय ऐरणीवर आला आहे.(Hoarding Collapse On Pune Solapur Road)
होर्डिंग अंगावर पडल्यामुळे घोडा गंभीर जखमी झालाय. तसेच गुलमोहर लॉन्स कार्यालयासमोर दुचाकी, कारसह बँड वादकांच्या वाहनांचं मोठे नुकसान झाले आहे. मिरवणुकीसाठी आणलेला घोडा सुद्धा होर्डिंग अंगावर पडल्यामुळे गंभीर जखमी झालाय.
घाटकोपरमधील होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना घडल्याची बातमी ताजी असतानाच आता पिंपरी-चिंचवड शहरातही एक होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. शहरातील मोशी भागामध्ये स्पाईन रोड मोशी येथील जयगणेश साम्राज्य चौकातील मोठ्याआकाराचे होर्डींग गुरुवारी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर पडले. या दुर्घटनेमध्ये टेम्पो, कार, पत्र्याच्या शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.(Hoarding Collapse On Pune Solapur Road)
त्यातच आता पुणे-सोलापूर महामार्गालगत लोणी काळभोर या ठिकाणी देखील एक होर्डिंग कोसळले आहे त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र एक घोडा जखमी झाला आहे. होर्डिंग शेजारी बँड पथक उभे होते, त्या बँड पथकावर पडल्यामुळे, बँड पथकाचे नुकसान झाले आणि घोडा गंभीर जखमी झाला आहे.यावेळी स्थानिकांनी तातडीने मदत केली. (Hoarding Collapse On Pune Solapur Road)
पुणे सोलापूर हायवे लगत लोणी काळभोर या ठिकाणी ही घटना घडली आहे. शहरातील अनधिकृत होर्डिंग्सवर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी व सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी होणारा खेळ तातडीने थांबणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.वादळी वाऱ्यामुळे किंवा इतर कारणांमुळे होर्डिंग कोसळल्यास जीवितहानी होण्याचा मोठा धोका आहे.या होर्डिंगवर कारवाई होत नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.(Hoarding Collapse On Pune Solapur Road)