Tuesday, July 16, 2024
Homeक्राइमखंबाटकी घाटात दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या शिरूर तालुक्यातील चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

खंबाटकी घाटात दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या शिरूर तालुक्यातील चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

११ जून – मौजे वेळे (ता.वाई) गावच्या हद्दीत करुणा मंदिराच्या समोरील बाजूला पुणे ते सातारा रस्त्याच्या झाडीमध्ये अंधारात पाच लोक त्यांच्या मोटरसायकल बाजूला लावून बसले असून ते महामार्गा वरुन जाणा-या लक्झरी बस लुटणार असल्याची माहिती मिळताच सहाय्यक निरिक्षक गर्जे यांनी  वरिष्ठांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे पथकाने सापळा लावुन रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास अंधारात बसलेल्या व दरोडयाच्या तयारीत असलेल्या ४ संशयीतांना शिताफीने ताब्यात घेतले.(Crime News)

त्यांच्या सोबत असलेला पाचवा साथीदार हा अंधाराचा फायदा घेऊन पळुन गेला. परंतु ताब्यात घेतलेल्या संशयीतांकडे विचारपूस केली असता, ते पुणे जिल्हयातील शिरुर तालुक्यातुन येवून खंबाटकी घाटामध्ये लक्झरी बस अडवून त्यातील प्रवाशांचे दागिने, पैसे लुटण्यासाठी त्या ठिकाणी थांबले असल्याचे त्यांनी सांगीतले. पंचांसमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्या अंगझडतीमध्ये एक सुरा, दोन लोखंडी रॉड, प्लॅस्टिकच्या पिशवीत मिरचीची पुड, मोबाईल तसेच दोन मोटर सायकल असे एकूण २ लाख ७९ हजार रुपयाचे साहित्य मिळुन आले आहे.(Crime)

याबाबत रविराज वर्णेकर यांच्या तक्रारीवरुन भुईज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पळून गेलेला आरोपी हा ३० ते ३५ वयोगटातील असुन त्या आरोपीचा शोध सुरु आहे. दरम्यान पकडलेल्या आरोपींची नावे संतोष बाळासाहेब चव्हाण (वय ३४), अक्षय दत्तात्रय शितोळे (वय २६), योगेश आनंदा वाळुंज (वय २५ तिघेही राहणार शिंदोडी ता .शिरुर जिंल्हा पुणे), सिध्दांत यशवंत कांबळे (वय ३१ राहणार निमोने ता.शिरुर जिल्हा पुणे) अशी आहेत.(Crime)

जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख, अपर पोलिस अधिक्षक श्रीमती आंचल दलाल, वाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी बाळासाहेब भालचीम, एलसीबीचे पोलिस निरिक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक रमेश गर्जे, फौजदार विशाल भंडारे, पोलीस अंमलदार ज्ञानदेव राजे, नितीन जाधव, आप्पासाहेब कोलवडकर,सोमनाथ बल्लाळ, रविराज वर्णेकर, सागर मोहिते, किरण निंबाळकर, अजय सपकाळ, सुहास कांबळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.(Pune police)

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!