कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा (ता.शिरूर) ग्रामीण भागात श्री गणेशाचे उत्साहाच्या वातावरणात आगमन झाले असून आता गौरींचे किंवा गौराईचे आगमन मोठ्या भक्तिभावाच्या वातानारणात झाले असून यादिवशी नेमकी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांनी गैराईचे स्वागत पावसाच्या वातावरणात झाले असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी ग्रामीण भागात गौरी चे आगमन उत्साहाच्या व भक्तिमय वातावरणात केले गेले.
माहेरवाशीण म्हणून सोनपावलांनी आलेल्या गौराईचे सर्व सोपस्कार मुख्यत्वे घरातील गृहिणी व मुलांकडून स्वागत करण्यात येते.
यामध्ये गौरी आवाहन म्हणजेच गौरीला अंगणातून ओट्यावर आणणे , ओट्यावर रांगोळी काढून त्या रांगोळीवर पाट व पाटावर सूप ठेवून त्यामध्ये गौरी ठेवून पूजन करणे . पूजेच्या या ठिकाणापासून संपूर्ण घरात गौरी वास करत असल्याच्या पाऊलखुणा म्हणून घरभर हाताचे ठसे तांदळाच्या पीठाने व हळदी व कुंकुने रंगवणे . (यालाच येथे सोनपावलांनी गौरी मातेने घरात प्रवेश केला असल्याचे मानले जाते . )
याचवेळेस घरातील व्हरांड्यात किंवा आताच्या शब्दाप्रमाणे हॉल मध्ये छानशी आरास करून त्यामध्ये गौरी स्थापित करणे . यावेळी होणारी संपूर्ण पूजा अर्चा घरातील महिलाच करतात . माहेरवाशीण म्हणून आलेल्या गौराईला नैवध्य म्हणून तालुक्याचे मुख्य पीक असलेल्या तांदळाच्या पिठापासून व नारळ गुळाचा चव वापरून केलेले उकडीचे मोदक, घराच्या परस बागेत उगवणाऱ्या देठाची भाजी,तांदळाची खीर,तांदळाची भाकरी,गुळाबरोबर उकडलेले पोहे आदी भात पिकाशी निगडित असलेला नैवैध्य दाखवला जातो.
गौरी गणेशाची कोण –
आपल्याकडे गौरीला माहेरवाशीण म्हटले जाते. गौरी म्हणजेच पार्वतीचेच रूप आणि गणपती हा गौरीचा पुत्र म्हणजेच गौरीला गणपतीची आई आहे.
भाद्रपद शुक्लपक्षात चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात असतांना गौरीचे पूजन करतात म्हणून ही ‘ज्येष्ठा गौरी’ म्हणून ओळखली जाते. गौरी म्हणजे हिमालयाची कन्या, भगवान शंकराची पत्नी गणपतीची माता ‘पार्वती’ होय. भारत हा शेतीप्रधान देश आहे. भाद्रपद महिन्यात शेतात नवीन धान्य तयार होते म्हणून गौरी ‘धान्य लक्ष्मीच्या रूपात घरात प्रवेश करते. म्हणून या सणाला प्राचीन कालापासून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सासरी गेलेली मुलगी गौरीच्या सणासाठी माहेरी येत असते. गौराई माझी लाडाची गं !’ असे म्हणत आई आपल्या मुलीचे कौतुकाने स्वागत करीत असते. गौरी पूजनाच्या दिवशी तिला तिच्या आवडीचे पदार्थ जेऊ खाऊ घालीत असते. गौरीचा सण थाटामाटाने साजरा करीत असतांना प्रत्येक स्त्री त्या गौरीमध्ये स्वतःला पाहत असते. म्हणून ज्येष्ठा गौरींचा जिव्हाळ्याचा हा सण अनेक वर्षे परंपरागत पद्धतीने घराघरातून साजरा होत असतो. या