Tuesday, July 16, 2024
Homeताज्या बातम्यापिंपळे जगतापच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विविध स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश

पिंपळे जगतापच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विविध स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश

कोरेगाव भिमा – पिंपळे जगताप (ता.शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनी मंथन राज्यस्तरीय परीक्षा, अभिरूप स्पर्धा परीक्षा व NSSE परीक्षांमध्ये  उत्तम कामगिरी करत आपले गुणवत्ता सिद्ध केली आहे.

मंथन राज्यस्तरीय परीक्षेमध्ये गुणवंत विद्यार्थी – इयत्ता दुसरीतील तन्मय गणेश खेडकर या विद्यार्थ्याने  गुण ११२/१५० मिळवत  केंद्रस्तर गुणवत्ता यादीत चौथा क्रमांक मिळवला आहे.इयत्ता तिसरीतील सर्वज्ञ अशोक बेंडभर या विद्यार्थ्यानेगुण २५०/३०० मिळवत  केंद्रस्तर गुणवत्ताा यादीत चौथा मिळवलं आहे. प्रियल अशोक नाईकनवरे या विद्यार्थिनीनेगुण २४६/३०० मिळवत केंद्रस्तर  गुणवत्ता यादीत पाचवा मिळवला.

अभिरूप स्पर्धा परीक्षेतुल गुणवंत विद्यार्थी – इयत्ता तिसरीतील कु.प्रियल अशोक नाईकनवरे   गुण-२६८/३०० जिल्हास्तर गुणवत्ता यादी सहावी आली तसेच सर्वज्ञ अशोक बेंडभर  गुण – २६०/३०० मिळवत केंद्रस्तर गुणवत्ता यादीत चौथा क्रमांक मिळवला आहे

NSSE परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी – सर्वज्ञ अशोक बेंडभर या विद्यार्थ्याला गुण १८२/२०० मिळवत राज्यस्तर गुणवत्ता यादीत नववा आला तर  प्रियल अशोक नाईकनवरे या विद्यार्थिनीने गुण १७६/२००  केंद्रस्तर गुणवत्ता यादी तेरावी आली असून विघ्नेश रामदास थिटे या विद्यार्थ्याला  गुण  १७२/२०० केंद्रस्तर गुणवत्ता यादीत पंधरावा मिळवला आहे. या परीक्षांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन अनुराधा गट मॅडम यांनी केले.

  गुणवंत विद्यार्थी – विद्यार्थिनी यांच्यासह मार्गदर्शक शिक्षिका यांचे अभिनंदन सरपंच सोनल अशोक नाईकनवरे, उपसरपंच रेश्मा कुसेकार व सर्व ग्राम पंचायत सदस्य यांनी केले तसेच शाळेचे मुख्याध्यापक विलास नारायण भोंगळे , केंद्रप्रमुख गौतम गायकवाड , विस्तार अधिकारी वंदना शिंदे,  शिरूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर  यांनी अभिनंदन केले तेच गुणवंत विद्यार्थी ,मार्गदर्शक शिक्षक, शिक्षक बंधू-भगिनी,मुख्याध्यापक,पालक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व ग्रामस्थ यांनी कौतुक करत अभिनंदनाचा वर्षाव केला.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!