Monday, October 14, 2024
Homeकृषिनॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशन च्या वतीने मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षरोपन

नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशन च्या वतीने मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षरोपन

नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशन पुणे आणि बकोरी वनराई प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने उच्च तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवस व जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बकोरी येथील वनराई प्रकल्पामध्ये वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन उपक्रमा अंतर्गत हवेली मधील भाजपचे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष  प्रदीप कंद यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करन्यात आले.

 या वेळी  चंद्रकांत वारघडे यांनी वनराई  प्रकल्पाची माहिती देत वृक्ष संवर्धनाबाबत मार्गदर्शन केले. डॉ.सचिन कोतवाल यांनी कार्यक्रमाची भूमिका सांगितली .आजच्या या परिस्थितीत फार्मसी क्षेत्रातील तज्ज्ञ  वृक्षरोपण आणि वृक्षसंवर्धन याबाबत जागरूक असल्याचे आशादायक चित्र असून यातून विद्यार्थ्यांमध्ये मोठा संदेश जाईल अशी अपेक्षा व्यक्त करत नॅशनल फार्मसी असोसिएशन चे कौतुक करत वारघडे यांना वृक्ष संवर्धन कामी शुभेच्छा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष  प्रदिप कंद यांनी दिल्या.

 या वेळी चिंच, वड,पिंपळ अशा वीस देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रमास फार्मसी क्षेत्रातील शिक्षक , कर्मचारी उपस्थित होते.

माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांचे चिरंजीव कु.धणराज वारघडे २१ व्या वर्षी एव्हरेस्ट बेस कॅम्प सर केल्यामुळे त्याचा विशेष सन्मान प्रदिप कंद यांचे हस्ते करण्यात आला.

  या वेळी बाकोरी वनराई प्रकल्प व  माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे, नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष व  प्राचार्य पी. डी.इए. शंकरराव उसळ, कॉलेज ऑफ फार्मसी खराडी,डॉ.सचिन कोतवाल, वाघोली येथील ज्येष्ठ उद्योजक नृसिंह सातव,भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे डॉ.पोपटराव जाधव, प्रा.प्रवीण जावळे,डिलाईट इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोरेगाव भीमा प्राचार्य डॉ.संपत नवले , लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसी फुलगाव प्राचार्य प्रा.नरहरी पाटील, भालचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी खानापूर प्राचार्यडॉ.गौरीशंकर स्वामी, जेएसपीएम इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ताथवडे डॉ.प्रशांत हंबर, सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी शिरूर प्राचार्य डॉ.अमोल शहा, एव्हरेस्टविर धनराज वारघडे उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!