Tuesday, July 16, 2024
Homeताज्या बातम्यानिमगाव भोगी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी विकास रासकर यांची बिनविरोध निवड

निमगाव भोगी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी विकास रासकर यांची बिनविरोध निवड

निमगाव प्रतिनिधी

निमगाव भोगी ग्राम पंचायतीच्या उपसरपंच पदाचा सुषमा ज्ञानेश्वर बढे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदाची निवडणूक लागली होती. या निवडणूक निर्णय प्रक्रियत विकास कांतीलाल रासकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रामसेवक गवळी यांनी दिली.

उपसरपंच निवडीची सभा निमगाव भोगीच्या सरपंच उज्वला अंकुश इचके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नवनिर्वाचित उपसरपंच विकास कांतीलाल रासकर यांचा सत्कार माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर यांनी केला. यावेळी ग्रामपंचायत सर्व सदस्य आजी माजी सरपंच,उपसरपंच, सोसायटी चेअरमन, व्हा चेअरमन, संचालक आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!