Tuesday, July 16, 2024
Homeइतरधक्कादायक ! पुण्यातील नारायणगाव येथे महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणी ७० ते ८०...

धक्कादायक ! पुण्यातील नारायणगाव येथे महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणी ७० ते ८० जन ताब्यात

महादेव बेटिंग अ‍ॅपची (Mahadev Betting App) पाळंमुळं पुण्यापर्यंत पोहोचली आहेत. महादेव बेटिंग प्रकरणी पुणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी नारायणगाव येथे छापेमारी केली असून ७० ते ८० जणांना ताब्यात घेतलं आहे.

नारायणगाव येथील एका इमारतीत ॲपचं काम सुरु होतं. धक्कादायक म्हणजे संपूर्ण इमारत महादेव अ‍ॅपसाठी वापरली जात होती. महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणी सध्या मोठी कारवाई सुरु आहे. या प्रकरणाची पाळमुळं परदेशापासून ते बॉलिवूडपर्यंत पोहोचली आहे. त्यातच आता पुण्याचं कनेक्शनही समोर आलं आहे. नारायणगाव शहरातील एका इमारतीत याचं काम सुरु होतं. संपूर्ण इमारत महादेव अँपसाठी वापरत असल्याची माहिती मिळाली आहे. प्राथमिक माहितीनुसरा, ७० ते ८० जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तपास सुरु आहे. 

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!