Tuesday, July 16, 2024
Homeताज्या बातम्यानरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेताच सणसवाडी येथे जल्लोष

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेताच सणसवाडी येथे जल्लोष

भैरवनाथाची आरती करत एकमेकांना भरवले पेढे

दि ०९ जून – दिवंगत माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यानंतर पहिल्यांदाच तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेत इतिहास रचला तसेच देशात NDA आघाडी स्थापित नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करुन मोठ्या उत्साहात शपथविधी पार पडला. ( Narendra Modi)

या आनंदा प्रित्यर्थ उद्योगनगरी सणसवाडी येथे सायंकाळी ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ मंदिरात महाआरती घेऊन समाजातील सर्वसामान्य घटकांना आणखीन चांगले दिवस येऊन बळीराजा सुखी होऊन देशाची प्रतिमा पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आणखी उंचावत जाऊन विकसित राष्ट्र निर्माण होवो अशी प्रार्थना करुन महायुतीच्या सहकाऱ्यांनी एकमेकांना व ग्रामस्थांना आनंदाने पेढे भरवत ,जय श्रीराम.. भारत माता की जय…घोषणा देत फटाक्यांची तूफान आतषबाजी करण्यात आली.

यावेळी माजी सरपंच बाबासाहेब दरेकर , अशोक हरगुडे ,बाळासाहेब दरेकर ,विद्याधर दरेकर ,माजी सरपंच नवनाथ हरगुडे ,महादेव वाखारे ,प्रल्हाद दरेकर, हनुमंत दरेकर, महेंद्र दरेकर ,अतुल साठे, अंबादास कुरुंदले ,अशोक दरेकर, सोमनाथ दरेकर, उत्तम साठे ,विजयकुमार दरेकर, अर्जुन सैद, सागर यादव ,सुनील हरगुडे ,विकास घुटूकडे इत्यादी भाजपा व मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.(NDA)

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!