Tuesday, July 16, 2024
Homeताज्या बातम्या धानोरे सोसायटीच्या चेअरमनपदी बापूसाहेब रामदास भोसुरे यांची बिनविरोध निवड 

 धानोरे सोसायटीच्या चेअरमनपदी बापूसाहेब रामदास भोसुरे यांची बिनविरोध निवड 

धानोरे (ता.शिरूर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन पदाची निवडणूक  पार पडली यावेळी चेअरमन पदासाठी बापूसाहेब रामदास  भोसुरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध चेअरमन पदी निवड करण्यात आली.

चेअरमन तिरसिंग सुभाष जवळकर यांनी राजीनामा दिल्याने सदर रिक्त झालेल्या जागेची निवडणूक घेण्यात आली.यावेळी   बापूसाहेब रामदास भोसरी यांचा  एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध चेअरमनपदी निवड झाल्याचे  निवडणूक निर्णय अधिकारी  आप्पासाहेब धायगुडे व रुपेश शीलवंत यांनी जाहीर केले.

 यावेळी तीरसिंग जवळकर,बाबू गायकवाड, ज्ञानेश्वर थेऊरकर,मोहन कामठे, ऋषिकेश ढमढेरे,आशुतोष ढमढेरे,शालन दरेकर,चंद्रभागा तनपुरे,संचालक उपस्थित होते 

 चेअरमन पदी बिनविरोध निवड केल्याबद्दल सर्व संचालक व ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभारी असून शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देण्यात येणार असून त्यांच्या विकासासाठी काम करणार असून संस्थेचा नावलौकिक वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. – नवनिर्वाचित बिनविरोध चेअरमन बापूसाहेब भोसूरे 

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!