Tuesday, July 16, 2024
Homeइतरधक्कादायक ! शिरूर तालुक्यात भरदुपारी राहत्या घरात २३ वर्षीय महिलेचा गळा आवळून...

धक्कादायक ! शिरूर तालुक्यात भरदुपारी राहत्या घरात २३ वर्षीय महिलेचा गळा आवळून व करंट देऊन केला खून

शिरूर तालुक्यात एक धक्कादायक घटन घडली असून एका २३ वर्षीय महिलेचा भरदुपारी घरामध्ये गाका आवळून व लाईट चा करंट देत अज्ञाताने खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. (Crime News)

सदर प्रकरणी सदर महिलेचा पती स्वप्नील श्यामराव रणपिसे यांनी फिर्याद दिली असून शिरूर पोलीस स्टेशन यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.३ जुलै रोजी रोजी दुपारी २ वा. चे पुर्वी  रांजणगाव सांडस येथील रणपिसे वस्ती येथे राहते घरामध्ये कोणी तरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून  शितल स्वप्निल रणपिसे (वय २३ वर्षे) रा. रांजणगाव सांडस यांचा निळ्या रंगाच्या रस्सीने गळा आवळुन व  वायरने करंट देवुन  खुन केला. सदर प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरूध्द स्वप्नील श्यामराव रणपिसे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

  सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांचे मार्गदर्शना खाली  ए .पी.आय. अमोल पन्हाळकर हे करत आहे.(Murder Case)

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!