Tuesday, July 16, 2024
Homeक्राइमधक्कादायक! शिरूर तालुक्यात पोर्शे पॅटर्न....पोलिस पाटलांच्या अल्पवयीन मुलीने  पिकअपने फरफटत नेल्याने युवकाचा...

धक्कादायक! शिरूर तालुक्यात पोर्शे पॅटर्न….पोलिस पाटलांच्या अल्पवयीन मुलीने  पिकअपने फरफटत नेल्याने युवकाचा मृत्यू

शिक्रापूर (ता.शिरूर) सध्या देशभर पुण्यातील कल्याणीनगर भागातील पोर्शे कार प्रकरण चर्चेत असताना शिरूर तालुक्यातील आरणगावमध्ये पोलिस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने पिकअप चालवत असताना मोटारसायकलला समोरून जोरदार धडक देत पीकउप गाडीच्या मागच्या २० ते ३० फूट मागच्या चाकाखाली फरपटत नेल्याने अरुण विठ्ठल मेमाणे (वय३०) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर महेंद्र रावसाहेब बांडे हे गंभीर जखमी झाले आहेत. 

   वडगावबांडे ते आरणगाव रोडवर इसम नामे संतोष निवृत्ती लेंडे (पोलिस पाटील) यांनी त्यांची  अल्पवयीन मुलीला त्यांचे मालकीचे पिकअप वाहन क्र एम एच १२ एस एफ ३४३९  मुलीस चालवण्यास देवुन व स्वतः बाजुला बसुन  अरुण विठ्ठल मेमाणे (वय ३०) वर्षे हा चालवीत असलेल्या मोटारसायकल क्र एम एच १२ व्ही आर २० हीस समोरुन धडक देवुन मोटार सायकलसह चालकास २० ते ३० फुट फरफटत नेल्याने अपघातात अरुण मेमाणे यांच्या मृत्युस तसेच महेंद्र बांडे (वय २६) वर्ष यास गंभीर जखमी होण्यास कारणीभुत ठरले असुन अपघाताची खबर न देता तेथुन निघुन गेल्याने मृत्यूस कारणीभूत ठरले असल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून सदर प्रकरणी पोलीस पाटील संतोष निवृत्ती लेंडे व अल्पवयीन मुलगी यांच्यावर गुन्हा दखल करण्यात आला आहे.

या अपघात प्रकरणी मयत युवकाचा भाऊ सतीश विठ्ठल मेमाणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून त्यानुसार मिळालेली माहिती अशी की, ३१ मे रोजी सकाळी  सव्वादहाच्या सुमारास मयत अरुण विठ्ठल मेमाणे व त्याचा मित्र महिंद्र राउसाहेब बांडे असे दोघे  सप्लेंडर मोटार सायकल नंबर एम एच १२ एस एफ ३४३९ करून डिपीचे ऑइल आणण्यासाठी वडगावबांडे येथुन न्हावरे येथे जात असताना त्यांचे मोटार सायकलला अरणगावातील पिकअप नंबर एम एच १२ एस एफ ३४३९ यावरील अल्पवयीन चालकाने समोरुन ठोस देवुन मोटार सायकलसह चालकास २० ते ३० फुट फरफटत नेल्याने अपघातात अरुण विठ्ठल मेमाणे व त्याचा मित्र महिंद्र रावसाहेब बांडे जखमी झाल्याची फोनवर माहिती मिळताच  घरातील लोक नातेवाईकांनी सदर ठिकाणी जावुन पहाणी केली असता सदर अपघातग्रस्त पिकअप  अरुण मेमाणे यांच्या अंगावर गेलेला होता व सोबत त्याची मोटार सायकल देखील पिकअपच्या खाली पडलेली व  पिकअपचे बाजुला  महिंद्र  बांडे हा जखमी अवस्थेत असल्याने  जमलेल्या लोकांनी तात्काळ सदर पिकअप बाजुला करुन अरुण मेमाणे यांना बाहेर काढले तो जखमी झालेला होता. त्याची हालचाल चालु होती. पण त्यास बोलता येत नव्हते. तातडीने अरुण व त्याचा मित्र महेंद्र बांडे या दोघांनाही शिरुर येथील दवाखान्यात हलविले. महिंद्र  बांडे याला कमी लागले असल्याने  हॉस्पीटल येथे ॲडमिट केले तर अरुण मेमाणे यांना जास्त लागले असल्याने पुढील.उपचारासाठी  हॉस्पीटल येथे नेले असता डॉक्टरांनी त्याला तपासुन उपचारापुर्वीच तो मयत झाला असल्याचे  सांगितले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!