Tuesday, July 16, 2024
Homeक्राइमधक्कादायक ! विवाहितेची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी,  चिमुकल्याने  आईला मारलेली मिठी मृत्यूनंतरही...

धक्कादायक ! विवाहितेची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी,  चिमुकल्याने  आईला मारलेली मिठी मृत्यूनंतरही तशीच

एका आईने दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. द्रौपदी संतोष गोईनवाड (वय ३०), मुलगी पूजा गोईनवाड (वय ७) आणि मुलगा सुदर्शन गोईनवाड (वय ४) अशी मृतांची नावे आहेत.हे सर्वजण नांदेड जिल्ह्यातील गडगा गावचे रहिवासी आहेत. चरितार्थासाठी हे कुटुंब ८ महिन्यांपासून अंजनपूर येथे राहत होते. सोमवारी महिलेने मुलांना कवटाळत विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.(Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष गोईनवाड आणि द्रौपदी यांचा विवाह ९ वर्षांपूर्वी झाला होता. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी होती. उदरनिर्वाहासाठी ते बीड जिल्ह्यातील अंजनपूर येथील अमोल शितोळे यांच्या शेतात सालगाडीचे काम करायचे. संतोष हा ट्रॅक्टर घेऊन दुसऱ्याच्या शेतात नांगरणी करण्यासाठी गेला होता. घरी आल्यानंतर मुलगा व पत्नी न दिसल्याने संतोष व ग्रामस्थांनी शोधाशोध सुरू केली. दिनांक २१ मे पासून द्रौपदी दोन लेकरासह गायब होती.

पत्नी व मुलांचे मृतदेह विहिरीत असल्याचा संशय संतोषला आला. विहिरीतून पाणी काढल्यानंतर द्रौपदी आणि दोन मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठवण्यात आले. शवविच्छेदनानंतर तिघांचेही मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसून युसूफवडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पीएसआय चैनशेट्टी तपास करत आहेत.चिमुकल्याने

मृत्यूपूर्वी आईला मारलेली मिठी मृत्यूनंतरही तशीच – विवाहित महिला आणि मुलांचे मृतदेह वर काढल्यानंतर समोरील दृश्य पाहून सर्वांचे डोळे पाणावले. कारण, चिमुकल्याने मृत्यूपूर्वी आईला मारलेली मिठी मृत्यूनंतरही तशीच होती.  घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!