Tuesday, July 16, 2024
Homeक्राइमधक्कादायक ! शिरूर तालुक्यात विद्युत वाहिनीच्या धक्क्याने सात शेळ्या व दोन मेंढ्याचा...

धक्कादायक ! शिरूर तालुक्यात विद्युत वाहिनीच्या धक्क्याने सात शेळ्या व दोन मेंढ्याचा मृत्यू 

मलठण (ता. शिरूर )येथे मंगळवारी (ता. ११) सायंकाळी सहा च्या  सुमारास पाऊस पडल्याने शेतकरी उत्तम बाळासाहेब गोडसे हे शेळ्या घरी घेऊन जात असताना वीज वाहिनीचा धक्का बसून सात शेळ्यांचा तर दोन मेंढ्याचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने मालक उत्तम गोडसे (रा.मलठण ) हे बचावले. ही घटना आज सांयकाळी सहाच्या सुमारास घडली.

मलठण येथील गोडसे हे शेळ्यांचा कळप चरावयास घेऊन गेले होते. सायकांळी सहाच्या सुमारास ते शेळ्या घरी घेऊन जात होते. यावेळी प्रवाहित वीज वाहिनीचा धक्का  ९ शेळ्या व २ मेंढ्या यांना बसला. यामध्ये  शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला. शेळ्या जागीच पडल्याचे पाहिल्यानंतर गोडसे हे सावध झाले. ते पुढे गेले नाहीत, त्यामुळे ते बचावले. त्यांनी ही माहिती तेथील स्थानिकांना दिली. त्यानंतर महावितरणला माहिती देऊन तेथील वीज प्रवाह खंडित करण्यात आला. या घटनेमध्ये गोडसे यांचे सुमारे  दीड लाख रुपयांचे नुकसान झाले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!