मध्य प्रदेशातील जबलपूर येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडाने मध्य प्रदेशातीलच नव्हे तर देशातील हादरवलं आहे. या हत्याकांडातील मुख्य आरोपी मुकुल सिंह याला अटक झाल्यापासून या प्रकरणात दररोज काही ना काही धक्कादायक माहिती समोर येत आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची दिशाच बदलून टाकणारी आणखी एक गोष्ट समोर आली आहे.
आरोपी मुकुलने पोलिसांच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. मुकुलने सांगितलं की, घटनेनंतर ७५ दिवसांत मुकुलने अल्पवयीन मुलीसोबत ४५ वेळा शारीरिक संबंध ठेवले होते. हृदय पिळवटून टाकणारी बाब म्हणजे वडील आणि भावाचे मृतदेह खोलीत पडून असताना पाच तासात दोघांनी अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून असंही समोर आलं आहे की, आरोपी मुकुल जेव्हा मुलीच्या वडील आणि भावाची निर्घृण हत्या करत होता, तेव्हा अल्पवयीन मुलगी तिच्या मोबाईलवर व्हिडिओ बनवत होती.
मुकुलने असंही सांगितलं की, आरोपी मुलीचे वडील राजकुमार विश्वकर्मा यांची हत्या करत होता, त्यादरम्यान प्रेयसीचा लहान भाऊ तनिष्क जागा झाला होता. लहान भावाने बहिणीच्या पाया पडून वडिलांना मारू नका, अशी विनंती केली. मात्र, आरोपी मुकुलने अल्पवयीन भावावरही कुऱ्हाडीने वार केले. अल्पवयीन भावाच्या डोक्यात कुऱ्हाड अडकल्यानंतर प्रेयसीने कुऱ्हाड काढून पुन्हा प्रियकराला दिली आणि भावाचे पाय धरले. त्यानंतर प्रियकर मुकुलने पुन्हा अल्पवयीन भावावर तीन वार केले, त्यामुळे मुलीच्या अल्पवयीन भावाचाही मृत्यू झाला.
राजकुमार विश्वकर्मा यांच्या मृतदेहाचे तुकडे करून त्यांची विल्हेवाट लावण्याची दोघांची योजना असल्याने आरोपी मुकुलने गॅस कटर सोबत आणल्याचे सांगितले जात आहे. मात्र वेळेअभावी दोघांनी मिळून तो प्लॅन बदलला. पुढे योजना आखून वडिलांच्या मृतदेहाची स्वयंपाकघरात विल्हेवाट लावली, तर भावाला पॉलिथिनमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवलं.
मुकुलने पोलिसांना सांगितलं की, प्रेयसीच्या वडिलांची आणि लहान भावाची हत्या केल्यानंतर त्याने रक्त साफ केलं आणि दोन मृतदेहांशेजारी अल्पवयीन मुलीसोबत अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले. याशिवायही दोघांनी अनेकवेळा संबंध ठेवले होते. 5 सप्टेंबर रोजी मृत राजकुमार विश्वकर्मा यांनी त्यांच्या अल्पवयीन मुलीचा प्रियकर मुकुल सिंह याच्या विरोधात सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आरोपी मुकुल याने त्याच्या अल्पवयीन प्रेयसीसह तिच्या वडिलांना मार्गातून दूर करण्याचा कट रचत होता.