Tuesday, July 16, 2024
Homeक्राइमधक्कादायक! लग्नास नकार देणाऱ्या कुटुंबातील पाच लोकांची हत्या करत स्वतः गळफास घेत...

धक्कादायक! लग्नास नकार देणाऱ्या कुटुंबातील पाच लोकांची हत्या करत स्वतः गळफास घेत केली आत्महत्या

मुलीशी लग्न ठरवून ते मोडल्याचा राग मानत ठेऊन एका तरुणाने छत्तीसगड राज्यातील सारंगड जिल्ह्यातील थरगावमध्ये एकाच कुटूंबातील पाच लोकांची हातोडा व छन्नीने वार करून निर्घृण हत्या केली.(Crime News)

या हत्याकांडानंतर आरोपीने स्वत:ही गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला. मृतांमध्ये हेमलाल (५२), जगमती (२७ वर्ष), मीरा आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.(Murder Case)

मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा मुख्यालयापासून जवळपास २२ किलोमीटर दूर सलीहा थाना क्षेत्रातील थरगाव येथे ही घटना घडली. येथे एकाच कुटूंबातील ५ लोकांची हत्या करण्यात आली. सांगितले जात आहे की, आरोपी तरुणाचे या घरातील तरुणीसोबत लग्न ठरवले होते. मात्र काही कारणामुळे घरच्या लोकांनी लग्नास नकार दिला.

यामुळे नाराज झालेल्या तरुणाने मुलीच्या घरातील सर्व सदस्यांची हत्या करून स्वत:ही गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच बिलाईगड-सारगड जिल्ह्याचे एसपी यांनी पोलीस व फॉरेंसिक टीम घटनास्थळी रवाना केली.(Crime News)

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!