Tuesday, September 10, 2024
Homeक्राइमधक्कादायक... मित्र मैत्रिण गप्पा मारत असताना आले दोन चोर, दागिने घेतले...

धक्कादायक… मित्र मैत्रिण गप्पा मारत असताना आले दोन चोर, दागिने घेतले नंतर…मारहाण करत काढले नग्न फोटो..

महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेली एक तरुणी मोटारीतून आपल्या मित्रासह बारामती विमानतळ परिसरात फिरण्यास गेली होती. हे दोघे मोटारीत बसलेले असताना तेथे आलेल्या ३० ते ३५ वयोगटातील दोन अज्ञातांनी त्यांना चाकूचा धाक दाखवत युवतीच्या अंगावरील ९० हजारांचे दागिने बळजबरीने काढून घेतले. मारहाण करत दोघांच्या अंगावरील कपडे बळजबरीने काढायला लावत त्यांचे नग्न फोटो या दोघांनी काढून घेतले. हे फोटो व्हायरल करण्याची धमकीही देत मारहाण कऱण्यात आली.

बारामती तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी संबंधित २१ वर्षीय युवतीने फिर्याद दिली. शुक्रवारी (दि. १०) रोजी रात्री साडे सातच्या सुमारास बारामती विमानतळाजवळ ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवतीच्या स्वतःच्या गाडीतून दोघे बारामती विमानतळाच्या बाजूला गेले. तेथे मोटारीत ते गप्पा मारत बसले असताना रात्री साडे सातच्या सुमारास पाठीमागील बाजूने दोघे अज्ञात इसम तेथे आले. त्यांचे वय ३० ते ३५ च्या दरम्यान होते. त्यांनी तोंडाला मास्क लावले होते. त्यांनी जवळ येत या दोघांना चाकूचा धाक दाखवला. गळ्यातील दागिने काढून दे नाही तर इथेच मारुन टाकू, अशी धमकी दिली. युवतीच्या गळ्यातील ७० हजार रुपयांची सोन्याची साखळी आणि कानातील कर्णफुले असे ९० हजारांचे दागिने काढून घेतले. त्यांना दगडाने मारहाण करण्यात आली. दोघांच्या अंगावरील कपडे जबरदस्तीने काढायला लावून त्यांचे नग्न फोटो काढले. दोघांकडे पैशाची मागणीही केली असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!